
नाशिक ता: 21 अस्पृश्यता,गरिबी, दारिद्र्य,जात विषमता असे माणुसकीला काळोखात ढकलणाऱ्या माणसाला,दुःखाच्या महाभयंकर वेदना सोसलेल्या कष्टकऱ्याला सुखाचे आणि आनंदाचे दोन घास मिळावे,सन्मानाने जीवन जगता यावे यासाठी आयुष्यभर सद्गुण,संस्कार, कष्ट यांची पेरणी करणारा राजातला ऋषितुल्य महात्मा म्हणजे कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज होय.असे गौरवोद्गार साहित्यिक राजेंद्र देसले यांनी काढले.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रपती पुरस्कार विजेते लेखक, कवी, प्रसिद्ध प्रेरणादायी व्याख्याते अशोक कुमावत हे होते.

गिरणा गौरव प्रतिष्ठान आयोजित पुस्तकावर बोलू काही या गौरवशाली परंपरा असलेल्या उपक्रमात 315 व्या भागावर ते बोलत होते. नांदेडचे सुप्रसिद्ध लेखक डॉ.भगवान अंजनीकर यांच्या राजर्षी शाहू महाराज या पुस्तकावर त्यांनी चौफेर फेरफटका मारला.प्राध्यापक अंजनीकर यांचे एकूण 114 पुस्तकांचे लेखन साहित्य प्रकाशित झाले असून राज्यभर त्यांनी व्याख्याने दिली आहेत.प्रास्ताविकात साहित्यिक अशोक कुमावत यांनी राजर्षी शाहू महाराज यांच्या कार्याची ओळख करून देताना लोककल्याणकारी राज्य कसे असावे याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे करवीर संस्थान आणि सामान्य माणूस म्हणून अवघ्या 48 वर्षे जगलेल्या राजातला ऋषितुल्य महात्मा म्हणजे कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज यांच्या अविरत कष्टामुळे त्यांनी शेतकरी उभा केला , अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी प्रयत्न,गरीब विद्यार्थ्यांना वसतिगृह,मोफत शिक्षणाचा कायदा,विधवा विवाह,आंतरजाती विवाह अशा अनेक कार्याची माहिती दिली.प्रत्येकाने त्यांची विचारधारा घेऊन ती अमलात आणावी व जीवन समृद्ध करावे असे आवाहन केले.

विलास पोतदार आणि सुनील हिंगणे या भाग्यवान श्रोत्याना ग्रथंभेट देउन सन्मानीत करण्यात आले.
सुत्रसंचालन मधुकर गिरी यांनी केले तर योगाचार्य अशोक पाटील यांनी आभार मानले.
दरम्यान येत्या शुक्रवारी 23 ऑक्टोबर रोजी सविता पोतदार या त्यांच्या पुस्तकावर ऐसपैस गप्पा करणार आहेत.

