
ढेकू (प्रतिनिधी)
ग्रामोदय शिक्षण संस्था नाशिक संचलित प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा ढेकू येथे बोलठाण येथील प्रतिष्ठित कपड्यांचे व्यापारी श्री योगेश शेठ गुगळे यांनी त्यांच्या मुलगा कुमार नैतिक योगेश गुगळे यांचा वाढदिवस आश्रम शाळेतील निवासी विद्यार्थ्यांसोबत अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला

सदर कार्यक्रम प्रसंगी सर्वप्रथम शाळेचे मुख्याध्यापक श्री जे एम थोरात सर यांनी श्री योगेश शेठ गुगळे यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला तर त्यांच्या समवेत त्यांच्या पत्नी सौ. सपना योगेश गुगळे यांचा सत्कार शाळेतील शिक्षिका श्रीमती गीतांजली भामरे मॅडम यांच्या हस्ते करण्यात आला तसेच चिरंजीव कुमार नैतिक योगेश गुगळे यांच्या वाढदिवसानिमित्त त्याला शाळेच्या वतीने ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले त्याचा सत्कार शाळेचे अधीक्षक श्री नितीन नितानकर यांनी केला
वाढदिवसानिमित्त नैतिक गुगळे याकडून शाळेतील विद्यार्थिनींना शालेय गणवेश व विद्यार्थ्यांना बिस्किट वाटप करण्यात आले बोलठाण येथील व्यापारी वर्गाकडून अशाच प्रकारे दरवर्षी वेगवेगळे उपक्रम राबवून शाळेतील विद्यार्थ्यांना वस्तू स्वरूपात व मिठाई स्वरूपात भेट दिली जाते आश्रम शाळेच्या वतीने बोलठाण येथील श्री गुगळे परिवाराचे आभार श्री कामडी सर यांनी मानले

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री अनिल पवार सर यांनी केले कार्यक्रम प्रसंगी शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वृंद व इयत्ता पहिली ते दहावीतील विद्यार्थी उपस्थित होते

