
दातली ( प्रतिनिधी ) क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेचे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यामंदिर दातली तालुका सिन्नर या ठिकाणी आज संस्थेचे शिक्षणाधिकारी एकनाथ कारभारी भाबड यांचा भव्य असा सत्कार करण्यात आला. नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघ व सह्याद्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने आदर्श मुख्याध्यापकाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल विद्यालयाचे प्राचार्य पठाण एम एस यांनी शिक्षणाधिकारी एकनाथ भाबड सर यांचा सत्कार करण्यात आला.

सदर कार्यक्रमासाठी उच्च माध्यमिक विभागाचे विभाग प्रमुख केदार सर, ज्येष्ठ शिक्षक बोडके बी एम, भडंगे ए एल विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते

