
नाशिक:( प्रतिनिधी )एकलहरे कॉलनीतील एकात्मिक बालविकास सेवा योजनेत कार्यरत असलेल्या माया अभय टिल्लू यांना ग्रामीण भागातील बालकांच्या शैक्षणिक योगदानाबद्दल आणि त्यांचे पती पळसे येथील नासाका माध्यमिक विद्यालयातील कर्मचारी अभय नारायण टिल्लू या दाम्पत्याला शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल ‘नॅशनल टीचर अवॉर्ड-२०२६’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
कॉलेज रोडवरील गुरुदक्षिणा सभागृहात संपन्न झालेल्या विशेष कार्यक्रमात ग्लोबल एलिट मीडिया अँड टेक यांच्या वतीने त्यांना हा पुरस्कार मविप्रचा केटीएचएम महाविद्यालयातील प्राणीशास्त्र विभागप्रमुख प्रा.डॉ.विक्रम काकुळते यांच्या हस्ते आणि मनमाडच्या अचिव्हर्स हेरिटेज स्कूलच्या प्रमुख रंजीतकौर संधू, डॉल्फिन एंटरप्राईजेसचे मिलिंद औटी या मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र स्वरूपात प्रदान करण्यात आला. या सन्मानाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

