
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३४३० वा दिवस

एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, पवित्र आणि नीतिमान जीवन जगल्यामुळे प्राप्त होणारे अद्भुत सामर्थ्य त्यांच्याजवळ आहे. अशी शांत वृत्ती, असे समाधान, असे प्रेम, अबोल आणि अविरत कार्यमग्नता, आणि ज्यावेळी कृती आवश्यक असेल त्यावेळी सिंहसदृश सामर्थ्यांचे प्रकटीकरण - हे सगळे तुम्हाला आणखी कोठे आढळणार आहे बरे? हे पहा, तुमचे वारसदार तुमच्या समोर उभे आहेत; भावी भारतवर्ष तुमच्यासमोर उभा आहे. काढा तुमची ती मणिरत्न भांडारे, काढा हिरे जडविलेल्या आंगठ्या. हे सारे देऊन तुम्ही जगातून नाहीसे व्हा, तुम्ही अदृश्य होता न होता तोच नव भारताच्या जागृतीची पहिली ललकारी तुम्हाला ऐकू येईल. सगळ्या जगाला दणाणून सोडीत लक्ष लक्ष कंठातून ललकारी उठेल "वाह गुरु की फतेह!" - गुरूचा जयजयकार असो!
*स्वामी विवेकानंद...*
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर अश्विन इषमास २९ शके १९४८
★ अश्विन शुक्ल /शुध्द १०
★ शालिवाहन शके १९४८
★ शिवशक ३५१
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ विक्रम (रौद्र) संवत्सर २०८३
★ बुधवार दि. २१ ऑक्टोबर २०२६
★ श्रीमाधवाचार्य जयंती
★ १८३३ स्वीडीश संशोधक आणि नोबेल पुरस्काराचे प्रणेते अल्फेड नोबेल यांचा जन्मदिन.
★ १९२० वैदिक धर्म, संस्कृती, तत्वज्ञान यांचा विज्ञानाधारित अभ्यास करुन विविध विषयांवर १९७ ग्रंथांचे लेखन करणारे धर्मभास्कर ग. ना. कोपरकर यांचा जन्मदिन.
★ १९४३ आझाद हिन्द सेनेची सिंगापूर येथे स्थापना
★ १९५१ डॉ. शामाप्रसाद मुखर्जी यांनी दिल्ली येथे ’भारतीय जनसंघ’ या पक्षाची स्थापना केली.
★ भारतीय पोलिस स्मृती दिन.

