
आश्रय ट्रस्ट आणि सुधाकर ट्रस्ट यांचे मोलाचे सहकार्य.
नाशिक दिनांक २२ ऑक्टोबर : दुधारे स्पोर्ट्स फाऊंडेशन आणि स्व. उत्तमराव ढिकले स्पोर्ट्स फाऊंडेशन यांच्या वतीेने पिंंपळनारे, तालुका दिंडोंरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

या आरोग्य तपासणी शिबिरामध्ये शाळेच्या १५२ विद्यार्थ्यांचे डोळे तपासणीे आणि रक्त तपासणीे करण्यांत आली. या उपक्रमासाठी ठाणे येथील आश्रय सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक ट्रस्ट आणि सुधाकर बहुउद्देशीय सामाजिक संस्था ट्रस्ट यांचे सहकार्याने हे आरोग्य तपासणी शिबिर उत्तमरित्या पार पडले. या कार्यक्रम प्रसंगी दुधारे स्पोर्ट्स फाऊंडेशनचे अध्यक्ष अशोक दुधारे, उपाध्यक्ष आनंद खरे, सचिव सौ. विजया दुधारे, ओझर ग्रामपंचायतचे नगरसेवक अशोक कदम तसेच आश्रय सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक ट्रस्ट आणि सुधाकर बहुउद्देशीय सामाजिक संस्था ट्रस्ट यांचे पदाधिकारी सौ. अरुणा जठार, प्रो. प्रकाश पांगम, डॉ. प्राजक्ता जठार, दीपाली देवरे, पुूनम शिंदे, पिंपळनारे ग्रामपंचायतचे उपसरपंच रावसाहेब जाधव, शाळेच्या मुख्याध्यापिका विजया आहेर, निकम मॅडम, सोनारमॅडम, नाटकर मॅडम आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रत्येक व्यक्तीसाठी आपल्या शरीराचे आरोग्य सर्वात महत्त्वाचे आहे. अगदी लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिक या सर्वांनाच आरोग्य तपासणीची आवश्यक आहे. आमच्या शाळेत आरोग्य तपासणी केल्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. या शिबिराचे आयोजन केल्याबद्दल मुख्याध्यापकांनी दूधारे स्पोर्ट्स फाऊंडेशनचे आभार मानले.
यावेळी बोलताना अशोक दुधारे यांनी सांगितले की, आमच्या संस्थेच्या वतीने असे विविध उपक्रम राबवले जातात. याआधी विद्यार्थ्यांना गाणवेश, शाळेचे साहित्य, क्रीडा साहित्य वाटप याचप्रमाणे पर्यावरण संवर्धन साठी बीज रोपण, बीज उधळण असे विविध उपक्रम राबविले जातात असे सांगितले. सौ. विजया दुधारे यांनीही संस्थेच्या उपक्रमाबद्दल माहिती दिली. पुढील काळात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी अश्याच प्रकारे स्तुत्य उपक्रमाद्वारे प्रोत्साहन दिले जाईल असेही यावेळी अशोक दुधारे यांनी सांगितले. या शिबिरात मुलांना सुधाकर बहुउद्देशीय सामाजिक संस्था ट्रस्टचे प्रो. प्रकाश पांगम आणि डॉ. प्राजक्ता जठार यांनी या आरोग्य शिबिराबरोबरच आपला आहार कसा असावा. काय खावे, किती प्रमाणात खावे आणि काय खाऊ नये याचेही मोलाचे मार्गर्दर्शन केले.

