
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३४३९ वा दिवस

ह्या लोकीचे वा स्वर्गलोकीचे भोग भोगण्याच्या समस्त वासनांचा त्याग करा. ह्यालाच म्हणतात इहामुत्रफलभोगविराग. इंद्रिये आणि मन यांचा संयम दम आणि शम करा. आपण दुःख भोगत आहोत अशी जाणीवही न बाळगता सर्वप्रकारची दुःखे सहन करा. ह्याला म्हणतात तितिक्षा. मुक्तीखेरीज इतर सर्व गोष्टींचे विचार मनातून काढून टाका. हीच मुमुक्षा होय. गुरू व त्यांचा उपदेश यांवर, आणि आपण निश्चित मुक्त होऊ शकू यावर विश्वास ठेवा. हीच श्रद्धा होय. काहीही होवो, सदा सोऽहम् सोऽहम् म्हणा. खाताना, फिरताना, दुःखात पडला असताना - सर्वदा म्हणा, 'सोऽहम्, सोऽहम्' रात्रंदिवस हाच विचार मनात घोळवा हे जगत शून्य आहे मिथ्या आहे भगवंत एकमेव अंतिम सत्य आहे मुक्त होण्याची प्रबळ इच्छा मुमुक्षा अंगी धरा.
*स्वामी विवेकानंद...*
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर कार्तिक उर्जमास ८ शके १९४८
★ अश्विन वद्य /कृष्ण ५
★ शालिवाहन शके १९४८
★ शिवशक ३५१
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ विक्रम (रौद्र) संवत्सर २०८३
★ शुक्रवार दि. ३० ऑक्टोबर २०२६
★ १८८३ तत्त्वज्ञ आणि विद्वान, आर्य समाजाचे संस्थापक दयानंद सरस्वती यांचा स्मृतीदिन
★ १९०९ भारतीय अणुऊर्जा व अण्वस्त्र विकास कार्यक्रमाचे प्रणेते डॉ. होमी जहांगीर भाभा यांचा जन्मदिन.
★ १९९० मराठी, हिंदी चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, पटकथाकार, अभिनेते, चित्रपती शांताराम राजाराम वनकुद्रे ऊर्फ व्ही शांताराम यांचा स्मृतिदिन.
★ १९९६ लेखक, पत्रकार व कामगार संघटनेचे कार्यकर्ते प्रभाकर नारायण ऊर्फ भाऊ पाध्ये यांचा स्मृतीदिन
★ आंतरराष्ट्रीय ऑर्थोपेडिक परिचारिका दिन.

