
नाशिकरोड :(प्रतिनिधी )नाशिक त्र्यंबकेश्वर सिहंस्थ प्राधिकरण आयोजित कृतार्थ सेवाभावी संस्था
यांच्या सहयोगाने स्वर साधना धर्मादायी संस्था नागपूर यांच्या संगीतमय सांस्कृतिक कार्यक्रम गीत रामायण या सुरेल आणि नाविण्यपूर्ण गीत रामायण कार्यक्रमाचे सादरीकरण रविवार १ नोव्हेबर २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता नाशिकरोडमधील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह विभागीय आयुक्त कार्यालयाजवळ आयोजित करण्यात आले आहे. रामकथेतील भक्ती, त्याग, प्रेम, कर्तव्ये आणि आदर्श जीवनमूल्यांचा संगीतमय अविष्कार नाशिकरोडमधील संगीत व नाट्य रसिकांसाठी प्रथमच सादर होणार आहे. जास्तीत जास्त रसिकांनी या संगीत रजनीचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे. या सादरीकरणाचे मर्यादीत प्रवेश असल्यामुळे विनामुल्य प्रवेशिकेसाठी नाशिकरोड बिझनेस बँक, टीजेएसीबी बँक उगले टॉवर,गोपाल लाल (९८२२३२२३२२), विवेक बकरे (९९८६०८८४७०७), भूषण जोशी (८०५५६१९१४५) यांचेशी संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

