
सिन्नर येथील बसस्थानक परिसरातील महात्मा फुले चौकात संविधान प्रेमी व समविचारी संघटनांतर्फे महात्मा बळीराजास अभिवादन करण्यात आले. यावेळी क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व बळीराजा यांच्या प्रतिमेस पुष्पहार मान्यवरांकडून अर्पण करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष कॉम्रेड हरिभाऊ तांबे यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या ‘अखंड ‘या काव्यातील बळीराजाचे महत्त्व अधोरेखित केले. तसेच महामित्र दत्ता वायचळे यांनी यज्ञ, वेद आणि वाणीच्या माध्यमातून बहुजनांवर सांस्कृतिक व मानसिक गुलामी लादल्याचे सांगितले तर सेवानिवृत्त प्राचार्य रामनाथ विधाते सर यांनी बळीराजा हा शेतकऱ्यांचा राजा असून ग्रामीण भागात अजूनही स्त्रिया भावाला ओवाळताना’ इडा पिडा टळो – बळीचे राज्य येवो ‘ अशी मनोकामना करतात हा सांस्कृतिक संदर्भही दिला. यावेळी गावकरी स्तंभलेखक प्रा. प्रभाकर चतुर सर यांनी बळीराजा हा आपला महान पूर्वज असून आपण त्याचा स्वाभिमान बाळगून त्याच्या न्यायी विचारांचे पालन करण्याचे आवाहन केले.

सागर भालेराव यांनी महात्मा बळीराजा हा एक महान असा तत्वाचिंतक आणि लोककल्याणकारी राजा होऊन गेल्याचे निदर्शनास आणून दिले., दत्तात्रय आचार्य गुरु यांनी बालिप्रतिपादेच्या शुभेच्छा दिल्या तर बाळासाहेब आव्हाड यांनी बहुजन महापुरुषांचा व महात्मा बळीराजाचा विचारवारसा एकच असल्याचे प्रतिपादन केले. सदर कार्यक्रमासाठी मा. मुख्याध्यापक एस. आर. पगार, आर एन जाधव, शिवा सातभाई, भाऊसाहेब सांगळे, विकास मिठे, प्रकाश मदगे, दिलीप भांगरे, घोडेराव गुरुजी, दत्ताभाऊ माळी, संजय गोळेसर, गोपाल वरखेडे, भानुदास मुठे, अजय लोंढे आदी संविधान प्रेमी व समविचारी संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमात जमीर सय्यद सर यांनी प्रस्ताविकासोबतच जागतिक आरोग्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या तर सूत्रसंचालन विजय मुठे आणि आभार सेवानिवृत्त प्राचार्य भागिनाथ घोटेकर सर यांनी मानले. यावेळी’ इडा पिडा टळो,बळीचे राज्य येवो या घोषणांनी परिसर दणाणून गेला.कार्यक्रमाचे सांगता राष्ट्रगीताने झाली .

