
आद्य क्रांतिकारक राघोजी ब्रिगेड यांच्या वतीने आंबेबहुला येथे आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांची 221 वी जयंती त्यांना अभिवादन करून उत्साहात साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमाची सुरुवात आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी प्रतिमेस अभिवादन केले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष आद्यक्रांतिकारक राघोजी ब्रिगेडचे संस्थापक यांनी आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या कार्याची माहिती देताना म्हणाले की,या सह्याद्री मधील गोरगरीब आदिवासी जनतेच्या इतर समाजाच्या जमिनी ब्रिटिश धार्जिण्या सावकारशाहीने बळकावल्या होत्या त्या परत मिळवून देण्याचं काम आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे यांनी केले.ब्रिटिश सरकार व सावकारशाहीने आदिवासींवर केलेल्या अन्यायाविरुद्ध त्यांनी सशस्त्र बंड पुकारले. त्यांच्या लढ्यामुळेच आदिवासी समाजाला ओळख व स्वाभिमान मिळाला, राघोजी भांगरे हे इंग्रजांविरुद्ध लढणारे पहिले आदिवासी क्रांतिकारक होते. साताऱ्याचे छत्रपती प्रतापसिंह महाराज भोसले यांची गादी ब्रिटिशांनी खालसा केली होती ती परत मिळवून देण्याचं काम आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे यांनी केले.त्यांनी जल, जंगल, जमीन आणि आदिवासी समाजाच्या स्वाभिमानासाठी व भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली. त्यांचे विचार आजच्या तरुण पिढीने जपले पाहिजेत. असे म्हणाले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आकाश गवारी यांनी केले. सूत्रसंचालन बाबुराव पेढेकर यांनी केले. तर आभार तुषार मुठे यांनी मानले.
या कार्यक्रमासाठी आद्यक्रांतिकारक राघोजी ब्रिगेड चे संस्थापक रामु इदे, आकाश गवारी, बाबुराव पेढेकर, विश्वास इदे, अक्षय जाधव, दिपक ढगे, ओमकार बांगर, सुरज ढगे, संदीप गवारी, तुषार मुठे, ओमकार आवारी, मनोज मंडोळे, ऋषिकेश घारे, सुरज शिंदे आदी कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

