दि. ११ नोव्हेंबर २०२६ रोजी असलेल्या ‘ भाऊ बिज ‘ निमित्त साहित्यिक व कवी प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले यांची कविता वाचकांसाठी येथे प्रकाशित करीत आहोत

.भाऊ बहिणीचं नातं
भाऊ बहिणीचं नातं ।अगदी छान असतं ॥
दोघांचेही जीव प्राण ।गुंतले एकमेकात ॥
भाऊराया बहिणीचे ।खास असे बालपण ॥
एकमेकात गुंतले ।भाऊ बहिणीचे मन !!
कधी चॉकलेटसाठी ।खेळात जिंकण्यासाठी ॥
टीव्हीच्या रिमोटसाठी ।बालपणीचे भांडणं ॥
भाऊ असे पाठीराखा ।बहिणीचाच तो मान ॥
बहीण असे लाडकी ।भावाचा ती अभिमान ॥
बहीण जाते सासरी ।नयनी अश्रूंची गंगा ॥
भाऊंची बहिणीसाठी ।घट्ट जीवनाचा धागा ॥
दूर असली बहीण ।असे भाऊंच्या मनात ॥
गोड प्रेमळ नात्याला ।तोड नाही या जगात ॥
राज्यस्तरीय संत कबीरकवीराज पुरस्कार प्राप्त कवीप्रा.अरुण बाबारावजी बुंदेले,अमरावती: ८०८७७४८६०९

