
रामेश्वर ( प्रतिनिधी) मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे जनता विद्यालय रामेश्वर या विद्यालयात १५ ऑगस्ट २०२६ हा ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमासाठी मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे देवळा तालुका संचालक आदरणीय श्री विजय नानासाहेब पगार, शालेय समिती अध्यक्ष श्री. माणिक बापू पगार, तसेच स्कूल कमिटी सदस्य श्री, पगार सुकदेव श्रावण, श्री पगार आण्णा रंगनाथ, श्री पगार जगन्नाथ मोतीराम, श्री.पगार नितीन अमृत, श्री. पगार उत्तम सयाजी, श्री. पगार बाळासाहेब मालजी, श्री. पगार रघुनाथ नारायण, श्री पगार कारभारी विठ्ठल, श्री.पगार संदिप शिवाजी, श्री पगार गणेश हिरामण, श्री.कांदळकर रमण यमाजी, श्री.कांदळकर भरत कारभारी, श्री.गांगुर्डे शिवाजी मधुकर, श्री.पगार लक्ष्मण दावलं, श्री. पगार गुलाब हिरामण, श्री. पगार कारभारी उत्तम श्री.पगार चिंतामण शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सखी सावित्री समितीचे अध्यक्ष श्री भास्कर गंगाधर पगार व सदस्य
याप्रसंगी गावातील सरपंच/उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य व मंडळ पदाधिकारी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रामेश्वर मुख्याध्यापक व शिक्षकवृंद शासकीय आश्रमशाळा मुख्याध्यापक व शिक्षकवृंद, अंगणवाडी. सेविका व मदतनीस उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, विद्यालयाचे जेष्ठ शिक्षक श्री पगार जी टी सर व श्री सावंत बी एस सर यांनी केले, कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाच्या मुख्याध्यापक आदरणीय श्री. ढेपले बी के करतांना भारतीय स्वातंत्र्य दिनाचा इतिहास व पार्श्वभूमी सांगितली राष्ट्रीयध्वजाचे ध्वजपूजन व ध्वजारोहण शालेय समितीचे सदस्य माननीय श्री पगार उत्तम सयाजी यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच भारत स्काऊट गाईड ध्वजाचे ध्वज पूजन ध्वजारोहण शालेय समिती सदस्य आदरणीय श्री.पगार गुलाब यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच कु. नुतन जाधव हिने कॉपी मुक्त शपथ दिली. तिच्या समवेत सर्वांनी सामुहिक शपथ घेतली तसेच विद्यालयाचे जेष्ठ शिक्षक श्री सावंत बी. एस सर यांच्या नेतृत्वाखाली देशभक्तीपर गीतावर (संगीत) विद्यार्थ्यांनी कवायतीचे सादरीकरण केले. तसेच विद्यालयात एक पेड माँ के नाम या उपक्रमांतर्गत स्वातंत्र्य दिनानिम्मित मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रम यशस्वीपणे पाडण्यासाठी श्री श्री. भामरे पी एस सर, आहेर एम के सर , श्री गायकवाड एस टी सर, श्री परदेशी जी.बी सर, श्री आहेर पी डी सर, श्रीमती भामरे आर एम मॅडम, श्रीमती निकम मॅडम श्रीमती देवरे बी पी मॅडम, श्री.पाकळे पी. एन भाऊसाहेब, श्री पगार जे एस मामा श्रीमती मोरे एम एच मॅडम श्री सुधीर पवार मामा, श्री. पवार विनोद मामा , शिक्षक व शिक्षकेत्तर सेवकवृंद परिश्रम घेतले.शेवटी कार्यक्रमाचे आभार विद्यालयाचे जेष्ठ शिक्षक श्री पगार जी टी सर यांनी मानले. कार्यक्रमास विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

