
सिन्नर : अमरावती येथील जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या नवजात शिशू केअर युनिटमध्ये (SNCU) पहाटे भीषण आग लागून ३ नवजात बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेवर तीव्र संताप व्यक्त होत आहे.राष्ट्रवादी युवक काँग्रेस नाशिकचे जिल्हा सरचिटणीस आणि बहुजन मुक्ती आंदोलन राष्ट्रीय संघटन महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष प्रविण जगताप यांनी ट्विट करत बेजबाबदार प्रशासनाचा तीव्र निषेध केला आहे.”अमरावतीची घटना अत्यंत वेदनादायी आहे. शासकीय रुग्णालयांमधील निष्पाप बालकांचे बळी प्रशासकीय हलगर्जीपणामुळे जात आहेत. या संपूर्ण प्रकरणाची तातडीने उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा,” अशी मागणी प्रविण जगताप यांनी केली आहे.

