
नांदगाव 🙁 प्रतिनिधी ) जि. प. प्रा. केंद्र शाळा बाणगावचे मुख्याध्यापक तथा हनुमाननगर येथील रहिवासी श्री. संजय शेवाळे सर यांची लोकनेते गंगाधर शिवराम आहेर नांदगाव तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
शिक्षण क्षेत्रातील त्यांचे उल्लेखनीय कार्य, संघटन कौशल्य, सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची वृत्ती आणि शिक्षकांच्या प्रश्नांबाबत असलेली बांधिलकी यामुळे त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
शेवाळे सर यांच्या निवडीबद्दल शिक्षक बांधव, सामाजिक कार्यकर्ते, मित्र परिवार व हनुमाननगर परिसरातील नागरिकांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
त्यांच्या नेतृत्वाखाली पतसंस्थेच्या कार्याला नवी दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

