जगाचा पोशिंदा' या साहित्य समूहाकडून वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. या समूहातर्फे सुंदर विषय घेऊन स्पेशल उपक्रम मध्ये सहभागी झालेल्या कवी कवयित्रींना सन्मानपत्र दिले जाते. या प्रत्येक सन्मान पत्रावर, वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी किंवा कार्यरत असलेल्या व्यक्तीला मान सन्मान मिळावा म्हणून त्या व्यक्तीचा फोटो प्रकाशित केला जातो.
दिनांक २१ व २२ ऑगस्ट २०२६ रोजी घेण्यात आलेल्या 'माय मराठी' या विषयावरील लेखन उपक्रमात सहभाग घेतलेल्या कवी कवयित्रींना जे सन्मानपत्र दिले गेले, त्या प्रत्येक सन्मानपत्रावर कवी व गझलकार काशिनाथ महाजन यांचा फोटो प्रकाशित करण्यात आला आहे.
काशिनाथ महाजन यांनी सदर साहित्य समूहाचे अध्यक्ष आदरणीय भूषण ठाकरे सर, नागपूर यांचे व इतर पदाधिकाऱ्यांचे आभार मानले आहेत.