
आदित्य नंदू राठोड
Fatal Accident (जीवघेणा अपघात) केलेल्या वाहन चालक आरोपी एक्सिडेंट करून पळून जात असताना लोकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले FIR दाखल करत असतांना BNS 106(2) Hit & Run लावणे आवश्यक असताना BNS 106(1) हे चुकीचे लावले गेले आणि ताब्यातील आरोपीस फक्त BNS 35 ची नोटीस देऊन सोडून देण्यात आले हे बळीत व्यक्तीवर अन्याय केल्यासारखे आहे.
SP (ग्रामीण) श्री.जाधव साहेब आणि गृहमंत्री तथा मुख्यमंत्री साहेब यांना विनंती करण्यात येते की ड्रायव्हर पळून जात असताना त्यांना स्थानिकांनी पाठलाग करून पकडले यास अनेक लोक साक्षी आहेत यासाठी BNS106(2) हे कलम ऍड करावे अशी जनतेकडून मागणी होत आहे
दिनांक १९/०८/२०२६ रोजी ०८.३० वाजताच्या दरम्यान सोनवाडी तालुका कन्नड,येथील भील वस्तीच्या बाजूला रस्त्याच्या कडेला उभी असलेली मोटार,सायकल क्र. MH-41-BK-8406 या मोटर सायकलच्या मागच्या सीट जवळ टेकून उभा असलेला १७ वर्षाचा मुलगा नामे आदित्य नंदू राठोड यास सोयगाव कडून नागदकडे येणारी स्कूल बस (ज्यात लग्नाचे वऱ्हाड घेऊन अवैध वाहतूक करत असलेली) स्कूल बस क्र.MH-46-BB-3664 यांच्या चालकांनी हयगयने, आणि निष्काळजीपणे वाहन चालवून मोटर सायकल आणि मुलास ठोकर देऊन,Fatal Accident जीवघेणा अपघात केला.त्यात मुलाचा मृत्यू झाला.रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या आणि आजुबाजूच्या लोकांनी गाडी थांबविली मात्र ड्रायव्हर गाडीतून उतरून शेतामधून पळू लागला तेथील काही तरुणांनी ड्रायव्हरचा पाठलाग करून त्याला पकडून आणला आणि पोलिस येईपर्यंत पकडून ठेवले उपस्थित नागरिकांनी तात्काळ ॲम्ब्युलन्स मागवून एक्सिडेंट झालेल्या मुलास उपचारासाठी चाळीसगाव येथे पाठवले आणि काही लोकांनी पोलिसांना फोन केल्यामुळे कन्नड ग्रामीण पोलिस ठाण्याच्या नियत क्षेत्रातील नागद बीटचे पोलिस नाईक बक्कल क्रमांक ९१५ बी.डी.पवार तात्काळ घटनास्थळी हजर झाले पळून जात असलेला वाहन चालक आरोपीला लोकांनी बीट अंमलदार यांच्या ताब्यात दिले सदर बीट अंमलदार पवार यांनी अपघाती वाहन स्कूल बस क्र.MH-46-BB-3664 आणि आरोपी (वाहन चालक) फकीरशहा फकीर,रा.ठी.मदानी,तालुका-जामनेर जिल्हा-जळगाव,मोटार परवाना क्र. MH1920170003198 Badge No.8009640725 यास कन्नड पोलिस ठाण्याचे सबंधित गुन्ह्याचे तपासी अधिकारी PSI बाबू सुखदेव मुंडे आणि पोलिस ठाणे प्रभारी API गीते यांना पुढील तपास आणि कारवाई करण्याकरिता ताब्यात दिल्याचे सबंधित बीट अंमलदार यांनी प्रत्यक्ष सांगितले.
त्याच दिवशी कन्नड ग्रामीण पोलीस ठाणे येथे श्री.अशोक रामचंद्र पवार हे पोलिसांनी यांच्या फिर्यादीवरून गु.र.क्र.0244/2026 कलम 106(1),125(a),125(b), 281भारतीय न्याय संहिता (बी.एन.एस.) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला मात्र कन्नड पोलिस ठाण्याचे सबंधित अधिकाऱ्याने एक्सिडेंट करून पळून जाणाऱ्या चालकांविरुद्ध गुन्ह्याचे कलम BNS 106(2) हे कलम लावून ताब्यात असलेल्या आरोपीला अटक करणे आवश्यक होते मात्र तसे न करता केवळ BNS 106(1) हे कलम लावल्याने गुन्ह्याची प्रखरता कमी झाली आणि सुप्रीम कोर्टाच्या गाईड लाईन नुसार 35 ची नोटीस देऊन त्यांच्या ताब्यातील आरोपीला सोडून दिले.एवढेच नाही तर स्कूल बस असतानाही त्यात लग्नाचे वऱ्हाड घेऊन अवैध वाहतूक होतं होती आणि डेंजरस ड्रायव्हिंग असतानाही FIR मध्ये अवैध वाहतूकीचे,व डेंजरस ड्रायव्हिंगचे,मो.वा.का.चे करण्यासाठी कलम लावले नाही जनतेकडून पोलिसांच्या या कृतीवर संशय निर्माण होतं आहे
सदर प्रकरणाची तात्काळ चौकशी होऊन कलमात बदल करून किंव्हा वाढवून BNS 106(2) Hit & Run हे कलम लावण्यात यावे आरोपीस तात्काळ अटक करावी तसेच गुन्ह्याच्या कलमात अवैध वाहतूक,आणि डेंजरस ड्रायव्हिंगच्या कलमाचे देखील वाढ करण्यात यावेत अशी जनतेकडून मागणी होतं आहे.
नाना महाराज जाधव
सामाजिक कार्यकर्ता

