
बी. एस.एफ.बहुउद्देशीय संस्था अमरावती यांच्या वतीने आयोजित चौथ्या राज्यस्तरीय कविसंमेलनाचे अध्यक्ष म्हणून राष्ट्रपती पुरस्कार विजेते शिक्षक श्री.अशोक लक्ष्मण कुमावत यांची निवड करण्यात आली आहे.अशोक कुमावत हे
महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध प्रेरणादायी व्याख्याते,साहित्यिक,विचारवंत,कवी ,
उत्कृष्ठ सूत्रसंचालक ‘उठा तुम्हीही जिंकणारच ‘या महाराष्ट्रासह सातासमुद्रापार पोहोचलेल्या सर्वाधिक खपाच्या लोकप्रिय प्रेरणादायी पुस्तकाचे लेखक, राष्ट्रपती पुरस्कार विजेते आदर्श शिक्षक आहेत.त्यांनी ग्राहक पंचायत, गिरणा गौरव प्रतिष्ठान,कुमावत समाज विकास सेवा संस्था, पी. पी. के.फाउंडेशन, अंधश्रद्धा निर्मूलन,साहित्य परिषद,पेन्शनर्स संघटना अशा अनेक शैक्षणिक व सामाजिक संस्थांमध्ये विविध पदावर उल्लेखनीय कामगिरी केली आहे.ते बारा बलुतेदार संघाचे राज्याचे प्रमुख प्रवक्ते सेवानिवृत्त केंद्रप्रमुख आहेत.त्यांनीआतापर्यंत शाळा ,कॉलेज,
सामाजिक व्यासपीठावर विविध विषयांवरील शेकडो व्याख्याने दिली आहेत.
त्यांची आतापर्यंत प्रेरणादायी लेख,काव्यसंग्रह, चारोळी संग्रह ,ललित लेख,सामाजिक लेखन,अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आदी विषयांवरील 7 पुस्तके प्रकाशित झाली आहे.त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.
या कवी संमेलनात राज्यभरातून 60 कवी सहभागी होणार असून या प्रसंगी समाज वैभव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.उद्घाटक म्हणून हैदराबाद येथील समाजसेविका अनुराधा मारचट्टीवार , प्रमुख अतिथी म्हणून खान्देश येथील समाजसेविका ज्योती लोहार, प्रसिद्ध निवेदिका कांचन जाधव, सेलिब्रिटी गेस्ट अभिनेत्री पौर्णिमा झाल्टे छत्रपती संभाजीनगर,तसेच प्रसिद्ध साहित्यिक सुमनताई मुठे,सुहास टिपरे हे उपस्थित राहणार आहेत.जिल्ह्यातील कवी व श्रोत्यांनी बहुसंख्येने दिनांक 30 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता या भरगच्च कार्यक्रमात उपस्थित रहावे असे आव्हान आयोजक भूषण सरदार यांनी केले आहे.

