
नाशिक (प्रतिनिधी) : दि. १ ऑगस्ट २०२६ रोजी, साजऱ्या होत असलेल्या ‘लेखन प्रेरणा’ दिनानिमित्त ‘प्रज्ञावंत साहित्यिक अण्णा भाऊ साठे’ या विषयावर परिसंवाद ज्ञानसत्र, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या यशवाणी वेब रेडीओवर विद्यापीठाच्या महाकवी वामनदादा कर्डक अध्यासनातर्फे विद्यापीठाचे मा. कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे यांची संकल्पना व प्र- कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन यांच्या कल्पक मार्गदर्शक सूचनेनुसार दि. १३ ऑगस्ट २०२६ रोजी हे ज्ञानसत्र संपन्न झाले. विद्यापीठाच्या महाकवी वामनदादा कर्डक अध्यासनाचे प्रमुख प्रा. विजयकुमार पाईकराव यांनी या ज्ञानसत्राचे समन्वयन व सूत्रसंचलन आणि आभार प्रदर्शन केले.

समग्र परिवर्तनाची आस, कामगार चळवळ, दलित चळवळ, मार्क्सवादी व आंबडेकरवादी धगधगते भारतीय समाज वास्तव जातीअंत व वर्गअंत यावर आधरित जानिवा पूर्ण करणारे लेखनही प्रज्ञावंत साहित्यिक अण्णाभाऊ साठे यांच्या नव्या युगाची हाक होती असे विवेचन डॉ. राजेंद्र बगाटे, डॉ . सचिन पोरे, डॉ. वासुदेव राऊत, प्रा. विजयकुमार पाईकराव या सर्वच परीसंवादकांनी केले.
हा कार्यक्रम अध्ययनार्थी व श्रोत्यांसाठी https://avc.ycmou.ac.in या विद्यापीठ संकेतस्थळावर कायमस्वरूपी श्रवणासाठी उपलब्ध करून देण्यासाठी विद्यापीठ दृक्श्राव्य केंद्राचे प्रमुख प्रा. जयदीप निकम यांच्या मार्गदर्शनाखाली तंत्रसहाय्यक श्री. प्रकाश सापनर, श्री. गिरीश गवळी यांनी तांत्रिक परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचा अध्ययनार्थी, शिक्षक, संशोधक तसेच सर्व नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन अध्यासनप्रमुख प्रा. विजयकुमार पाईकराव यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्री. दिपक राजगिरे यांनी विशेष परिश्रम घेतले.

