
नाशिक (प्रतिनिधी)मराठा विद्या प्रसारक समाज, नाशिक संस्थेच्या विविध अडचणी आणि प्रलंबित प्रश्नांबाबत आज शिष्टमंडळासह राज्याचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची भेट घेऊन सकारात्मक चर्चा केली. यावेळी संस्थेच्या कृषी महाविद्यालयाच्या नूतन वास्तूचे उद्घाटन मा. मुख्यमंत्री महोदयांच्या शुभहस्ते व्हावे, यासाठी त्यांना निमंत्रण दिले.
संस्थेच्या विविध प्रश्नांवर सकारात्मक भूमिका घेत सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिल्याबद्दल मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचे मनःपूर्वक आभार.
यावेळी चांदवड-देवळा विधानसभेचे आमदार मा. डॉ. राहुल आहेर तसेच संस्थेचे सरचिटणीस ॲड.नितीन ठाकरे, सभापती बाळासाहेब क्षिरसागर, उपाध्यक्ष विश्वास मोरे, उपसभापती डी.बी.मोगल, चिटणीस दिलीप दळवी व अमृता पवार उपस्थित होते.

