
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३३७४ वा दिवस

जीवन्मुक्त पुरुषाचा देह आपोआपच उचित वा शुभ कर्म करीत असतो. तो केवळ चांगले कार्यच करू शकतो, कारण तो संपूर्णपणे पवित्र होऊन गेलेला असतो. ज्या जुन्या संस्कारांच्या वेगामुळे त्याचे शरीररूपी चाक (मुक्तीनंतरही) धावत असते ते सारे संस्कार केवळ शुभच असतात. त्याचे अशुभ वा वाईट संस्कार सगळेच्या सगळेच दग्ध होऊन गेलेले असतात.
यदच्युत-कथालाप-रस-पीयूष-वर्जितम् ।
तद्दिनं दुर्दिनं मन्ये, मेघाच्छन्नं न दुर्दिनम् ।।
तोच दिन खराखुरा दुर्दिन म्हणावा की ज्या दिनी आपण भगवंताविषयी बोलत नाही, त्याच्या लीलांच्या रसाचे अमृत पान करीत नाही; ज्या दिवशी मेघांनी आकाश कुंद होऊन वादळ सुटते वा पाऊस येतो तो दिन काही खराखुरा दुर्दिन नव्हे. त्या परम प्रभूविषयीचे प्रेमच खरीखरी भक्ती होय, इतर कुणावरीलही प्रेमाला – मग ती व्यक्ती कितीही मोठी असली तरी भक्ती म्हणता घ्यावयाचे नाही. येथे परम प्रभू म्हणजे परमेश्वर.
स्वामी विवेकानंद…
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर भाद्र नभस्यमास ४ शके १९४८
★ श्रावण शुध्द /शुक्ल १३
★ शालिवाहन शके १९४८
★ शिवशक ३५१
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ विक्रम (रौद्र) संवत्सर २०८३
★ बुधवार दि. २६ ऑगस्ट २०२६
★ ईद-ए-मिलाद

★ १९१० भारतरत्न व नोबेल पारितोषिक विजेत्या समाजसेविका मदर तेरेसा यांचा जन्मदिन.
★ १९२२ समाजवादी विचारवंत, स्वातंत्र्यसैनिक, शिक्षणतज्ञ, लेखक, राजकारणी, महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती ग. प्र. प्रधान यांचा जन्मदिन.
★ १९४४ लेखक व सामाजिक कार्यकर्ते अनिल अवचट यांचा जन्मदिन.

