
बोयगाव ( प्रतिनिधी ) : आयुष्मान आरोग्य मंदिर, कोंढार यांच्या वतीने राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य कार्यक्रम (RKSK) अंतर्गत जनता विद्यालय, बोयगाव येथे विविध आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन व समुपदेशन करण्यात आले. यावेळी विद्यालयातील शिक्षक व विद्यार्थ्यांना पोषण, मानसिक आरोग्य आणि व्यसनाधीनता याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमात किशोरवयीन मुलींना HPV लसीकरणाचे महत्त्व समजावून सांगताना हिसवळ आरोग्य केंद्राच्या डॉ.सौ. जगताप मॅडम, श्री. वाघ सर, श्री.कांबळे सर आदींनी गर्भाशय मुखाच्या कर्करोगापासून संरक्षण मिळण्यास HPV लस कशी उपयुक्त असल्याची माहिती दिली. लसीकरणासाठी पात्र असलेल्या किशोरवयीन मुलींचे HPV लसीकरण यावेळी करण्यात आले.
तसेच विद्यालयात VHNSC (Village Health, Nutrition and Sanitation Committee) बैठक घेण्यात आली. यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्र हिसवळ खु. येथील वैद्यकीय अधिकारी, उपकेंद्रातील समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य सेविका, आरोग्य सेवक, आशा सेविका व अंगणवाडी सेविका उपस्थित होते.
याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. काटवाणी ए. आर. यांनी विद्यार्थ्यांना आरोग्य, पोषण, व्यसनमुक्ती तसेच निरोगी जीवनशैलीचे महत्त्व याबाबत अनमोल मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. विसपुते पी. ए. यांनी केले. आरोग्य विभागाच्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आरोग्यविषयक जागरूकता निर्माण होण्यास मदत झाली.
या समुपदेशन कार्यक्रमाला विद्यालयातील सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, पालक वर्ग उपस्थित होते

