
नाशिक: दि.२६ वार्ताहर
नाशिक जिल्हा हिवताप निर्मूलन कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्या.नाशिक या पतसंस्थेचे 52 वी वार्षिक सर्वसाधारण सभा आय एम ए हॉल शालिमार चौक नाशिक येथे दि. 23ऑगस्ट 2026 रविवार रोजी अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. सन 2025-26 च्या सभेत सभासदांना 10% लाभांश जाहीर केला. कर्ज मर्यादा 8 लाखावरून 10 लाखापर्यत करण्यात आली. नवीन सभासद वाढविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे बाबत निर्धार केला. रिक्त संचालक पदी डी.एम. गोवर्धने यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. सर्व उपस्थितांनी त्यांचे अभिनंदन केले. अध्यक्षस्थानी चेअरमन श्री पृथ्वीराज भामरे होते. अहवाल वाचन व प्रास्ताविक आँन. सेक्रेटरी श्री संजय राव यांनी केले. प्रसंगी व्हा. चेअरमन सतीश अहिरराव व खजिनदार श्री प्रशांत अहिरराव तसेच संचालक श्री मधुकर शेरेकर श्री नामदेव वाणी श्री रमेश आवारी श्री सीताराम साबळे श्रीमती उषा देवरे श्रीमती पल्लवी कुलकर्णी श्री शिंदे श्री सानप व सचिव श्री नितीन गायकवाड प्रसंगी उपस्थित होते.

