
पुणे 🙁 प्रतिनिधी )Swift N Lift कंपनीच्या वतीने आयोजित ‘डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’ हा भव्य पुरस्कार सोहळा पुणे येथील निळू फुले नाट्यगृहात उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
या सोहळ्यात Swift N Lift कंपनीचे CEO निलेशजी साबे, कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी व छत्रपती शिवाजी महाराजांचे वकील काजी हैदर यांचे तेरावे वंशज सोहेलजी शेख, येवले चहाचे CEO नवनाथजी येवले तसेच सुप्रसिद्ध कवयित्री, साहित्यिका व गझलकार कविताजी काळे यांच्या शुभहस्ते तब्बल १४० गुणवंत शिक्षकांचा आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांच्या योगदानाचा सन्मान करणाऱ्या या सोहळ्याला मोठी उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन सुप्रसिद्ध निवेदक गणेशजी मोढवे यांनी आपल्या दमदार शैलीत केले.

