
मालेगाव (प्रतिनिधी ) मालेगाव येथील सामान्य रुग्णालय तसेच महिला व बाल रुग्णालयात दाखल असलेल्या बाधित रुग्णांची आज शालेय शिक्षण मंत्री ना. दादाजी भुसे यांच्या आदेशानुसार श्री. अजिंक्यभाऊ भुसे यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांसमवेत भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची आपुलकीने विचारपूस केली. तसेच वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून रुग्णांच्या प्रकृतीबाबत सविस्तर माहिती जाणून घेतली.

यावेळी सर्व रुग्णांची योग्य ती काळजी घेण्याच्या सूचना संबंधित अधिकारी व वैद्यकीय कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या. तसेच कोणत्याही प्रकारची आवश्यक मदत भासल्यास तात्काळ संपर्क साधण्याची सूचनाही करण्यात आली.

सध्या सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असून, प्रकृतीत सुधारणा झालेल्या काही रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
यावेळी शिवसेना पदाधिकारी, नगरसेवक व शिवसैनिक उपस्थित होते.

