
नांदगाव : महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे यांच्या वतीने आयोजित विविध क्रीडा स्पर्धांमध्ये कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, नांदगाव येथील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
नंदुरबार जिल्हा क्रीडा संकुल, नंदुरबार येथे पार पडलेल्या विभागीय वुशू स्पर्धेत महाविद्यालयाच्या कु. साक्षी प्रमोद सोनवणे (इयत्ता १२वी कला) आणि जन्मजय विनोद कांमळे (इयत्ता १२वी विज्ञान) या दोन खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड मिळवली.
तसेच दिनांक ४ ऑक्टोबर २०२६ रोजी स्व. मीनाताई ठाकरे स्टेडियम, विभागीय क्रीडा संकुल, नाशिक येथे पार पडलेल्या शालेय विभागीय स्तरावरील बॉक्सिंग स्पर्धेत महाविद्यालयाच्या कु. सोनाली दीपक पठाडे हिने प्रथम क्रमांक मिळवत राज्यस्तरीय स्पर्धेसाठी आपली निवड निश्चित केली. याच स्पर्धेत कु. प्राची काळे, कु. कावेरी काळे, कु. साक्षी सोनवणे आणि कु. वैष्णवी कुलथे यांनी द्वितीय क्रमांक मिळवत उल्लेखनीय कामगिरी केली.
दिनांक ५ ऑक्टोबर २०२६ रोजी लोणारे क्रीडा संकुल, येवला येथे झालेल्या विभागीय कुस्ती स्पर्धेत देखील महाविद्यालयाच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली. या स्पर्धेत कु. साक्षी प्रमोद सोनवणे हिने द्वितीय क्रमांक, तर कु. कावेरी काळे हिने तृतीय क्रमांक मिळवला.
महाविद्यालयाच्या खेळाडूंनी वुशू, बॉक्सिंग आणि कुस्ती या तिन्ही क्रीडा प्रकारांत मिळवलेल्या या यशामुळे महाविद्यालयाच्या क्रीडा क्षेत्रातील कामगिरीला नवी उंची प्राप्त झाली आहे.
या सर्व यशस्वी खेळाडूंचे मविप्र संचालक इंजि. अमितभाऊ बोरसे पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. यू. पाटील, डॉ. प्रवीण निकम (कनिष्ठ महाविद्यालय स्कूल कमिटी सदस्य), मा. दीपक अण्णा मस्के (ज्येष्ठ मविप्र सभासद), व्ही. वाय. काकळीज सर, दिनकर पाटील साहेब, राजेश पाटील साहेब, तसेच महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. संजय मराठे, श्री. डी. एम. राठोड, कला वाणिज्य विभागप्रमुख बोरसे जी. व्ही., विज्ञान विभागप्रमुख जपे पी. एन., क्रीडा संचालक लोकेश गळदगे, क्रीडा सहाय्यक दिलीप अहिरराव आणि महाविद्यालयातील सर्व ज्येष्ठ शिक्षक व शिक्षकेतर सेवकांनी अभिनंदन केले.
राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या खेळाडूंना पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. सर्व यशस्वी खेळाडूंना कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य श्री. डी. एम. राठोड, क्रीडा संचालक श्री. लोकेश गळदगे आणि क्रीडा सहाय्यक श्री. दिलीप अहिरराव यांचे योग्य मार्गदर्शन व तांत्रिक कौशल्य लाभले.

