
नाशिक ( प्रतिनिधी)
आज IMA फाउंडेशन नाशिक आयोजित महाराष्ट्रातील 58 कर्तृत्ववान महिलांचा गौरव करण्यात आला.माझी मी भारी नारी सन्मान सोहळा या महिला गौरवाच्या प्रसंगी गिरणा गौरव परिवाराच्या ज्येष्ठ महिला भगिनी ,चौथ्या अखिल भारतीय शेकोटी लोककला साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षा आदरणीय सुनंदा पाटील मॅडम यांचा यथोचित सन्मान करून एका समाजसेविका आणि लेखिकेचा मोठा सन्मान करण्यात आला.

त्यांच्या उत्तुंग कार्याला त्रिवार वंदन.या कार्यक्रमात माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला मार्गदर्शनाची संधी दिली,सन्मान केला त्याबद्दल महिला शक्तीचे मनापासून आभार.यावेळी चांदा ते बांदा,अगदी गडचिरोली,चंद्रपूर,कोल्हापूर , छत्रपती संभाजीनगर,लातूर , बीड अशा 22 जिल्यातील विविध क्षेत्रातील उत्तुंग यश मिळविणाऱ्या महिला भगिनी आलेल्या होत्या.फाउंडेशनच्या अध्यक्षा प्रा.आशा बिरारी,कार्यक्रमाच्या अध्यक्षा जेष्ठ कवयित्री सुमतीताई पवार,संयोजिका ज्येष्ठ साहित्यिका अलकाताई दराडे मराठा विद्या प्रसारक समाजाच्या मा.सरचिटणीस नीलिमाताई पवार,नगरसेविका भोसलेताई,नगरसेविका दळवीताई, साहित्यिक सुहास टिपरे , निवेदिका अश्विनी सांगळे आदींसह अनेक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

