
पाच विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड
नाशिक जिल्हा प्रतिनिधी-नवनाथ गायकर यांजकडुन-
महादेव प्रतिष्ठान संचालित एंजल इंग्लिश मीडियम स्कूल, वाडीवऱ्हे येथील विद्यार्थ्यांनी नाशिक जिल्हास्तरीय रोल पोलिंग स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
रविवार दि.१८ ऑक्टो. रोजी ग्लोबल इंटरनॅशनल स्कूल,मानोरी, ता. दिंडोरी येथे ही स्पर्धा उत्साहात पार पडली.
या स्पर्धेत शाळेच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून आपल्या क्रीडाकौशल्याचे उत्कृष्ट प्रदर्शन केले. नियमित सराव, मेहनत, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. स्पर्धेमध्ये 19 वर्ष आतील वयोगटातील मुलांच्या गटाने जिल्हास्तरीय तिसऱ्या क्रमांकाचे बक्षीस पटकावले तर मुलींच्या गटाने दुसऱ्या क्रमांकाचे बक्षीस पटकावले. विशेष म्हणजे, या स्पर्धेतील कामगिरीच्या आधारे शाळेतील पाच विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

या यशामुळे शाळेचे सर्वत्र कौतुक होते आहे.
या यशामागे मुख्याध्यापक श्री. बहिरु गायकर, कोऑर्डिनेटर रेखा गोवर्धने, सब को-ऑर्डिनेटर देवयानी वानखेडे,खेळाचे प्रशिक्षक श्री.अक्षय चौधरी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून त्यांच्या क्रीडाकौशल्याला प्रोत्साहन दिले.
विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल
महादेव प्रतिष्ठान नासिक संस्थेचे संस्थाचालक श्री. अतुल पांडे,श्री प्रमोद गुप्ता,श्री पवन जोशी,श्री अतुल आचले,श्री घनश्याम राठोड
यांनी शिक्षकासह विजेत्याचें अभिनंदन केले आहे.व राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
एंजल इंग्लिश मीडियम स्कूलच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून विद्यार्थ्यांचे अभिनंदन होत आहे.

