
सुकेणे (ता. निफाड) दि. १८ – महाराष्ट्र शासन, महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अंतर्गत कृषि संशोधन केंद्र, निफाड यांच्या वतीने रब्बी हंगाम शेतकरी-शास्त्रज्ञ मंच बैठक व चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.
हे चर्चासत्र दि. १९ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजता, मौजे सुकेणे, ता. निफाड, श्री. शामराव सीताराम मोगल यांच्या शेतावर झालेले आहे.
या कार्यक्रमाचे उद्घाटक तथा अध्यक्ष म्हणून मा. डॉ. प्रशांत बोडके, संशोधन संचालक, म.फु.कृ.वि., राहुरी हे लाभणार असून प्रमुख पाहुणे म्हणून श्रमसाफल्य शेतकरी-शास्त्रज्ञ मंचाचे अध्यक्ष मा. श्री. वैकुंठ पाटील उपस्थित होते.
यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून उपविभागीय कृषि अधिकारी श्री. भटू पाटील, सहयोगी संशोधन संचालक डॉ. अविनास कोळगे, द्राक्ष व कांदा संशोधन केंद्राचे प्रभारी डॉ. रवींद्र पाटील, तालुका कृषि अधिकारी श्री. सुधाकर पवार, पंचायत समिती कृषि अधिकारी श्री. संदीप मोगल, डाळिंब संशोधन केंद्राचे *डॉ. सचिन हिरे व डॉक्टर भरत माळुंजकर सर आदी मान्यवरानी मार्गदर्शन केले आहे .
या बैठकीत १) शेतकऱ्यांच्या समस्या, २) नवीन कृषी तंत्रज्ञान, ३) हवामान बदलाशी संबंधित उपाययोजना, ४) पीक व्यवस्थापन व इतर विषयांवर सखोल चर्चा झालेलीआहे. कार्यक्रमाचे संयोजक प्रा. भालचंद्र म्हस्के, गहू विशेषज्ञ, कृषि संशोधन केंद्र, निफाड हे आहेत.
तरी निफाड तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांनी या चर्चासत्रा साठी मोठ्या संख्येने लाभ घेतलेला आहे, समस्त अधिकारी व कर्मचारी वृंद, कृषि संशोधन केंद्र, निफाड हे देखील उपस्थिते होते.
धन्यवाद.
सोमेश्वर नैसर्गिक शेती शेतकरी गट सुंदरपुर
बीआरसी चालक संदीप प्रभाकर सोमवंशी

