
कोल्हापूर येथे रविवार १८ ऑक्टोबर रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला.
हवेली तालुक्यातील साने संगीत क्लासचे सर्वेसर्वा तथा कला-संगीत क्षेत्रात कार्यरत असलेले शिवराज ज्ञानोबा साने यांना ‘भारत कर्तव्यम गौरवगाथा कोल्हापूर २०२६’ अंतर्गत प्रतिष्ठेचा ‘दादासाहेब फाळके कलारत्न पुरस्कार’ जाहीर झाला. या पुरस्कारामुळे हवेली तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, कला क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. या पुरस्काराचे वितरण रविवार, दि. १८ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी १ वाजता कोल्हापूर येथील दसरा चौकातील छत्रपती शाहू स्मारक नाट्यसभागृहात झाले आहे.

सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते प्रकाश धोत्रे यांच्या शुभहस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला .असल्याची माहिती आयोजकांनी दिली. या सोहळ्यास संगीतकार श्री शिवराज साने,सौ. गीतांजली डोंबे, सौ. स्वाती तानावडे, श्रीकृष्ण बामणे, श्री स्वप्नील ननावरे यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमास उपस्थित मान्यवर श्री फिरोज शेख व्यवस्थापकीय संचालक मल्टी जीनियस प्रोफेशनल प्रा. लि. ( पुणे व लंडन), श्री महेश माने नगर अभियंता कोल्हापूर, श्री गणपत शिंदे महाराष्ट्र शासन कृषी पुरस्कार विजेते, सौ.मनीषा कांबळे. लेखिका, समीक्षक, डॉ. बी. एन. खरात स्वागताध्यक्ष. कृतज्ञता सन्मान पर्व कोल्हापूर, सौ. निलीमा भिंतोडे अध्यक्ष , ओंजळ बहुउद्देशीय संस्था, सातारा,आणि सौ. सीमा जाधव API सांगली यांच्यासह विविध क्षेत्रांतील दिग्गज मान्यवर,

पदाधिकारी व प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. श्री शिवराज ज्ञानोबा साने यांना हा पुरस्कार जाहीर झाल्याने ऊरूळी कांचन व हवेली तालुक्यातील कला-संगीत क्षेत्रातील त्यांच्या कार्याची दखल घेतली गेल्याची भावना व्यक्त होत आहे. त्यांच्या या यशाबद्दल विविध स्तरांतून अभिनंदन केले जात आहे.

