
नासिक ( प्रतिनिधी)= मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र शासन, व महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ, मुंबई अनुदानित, सार्वजनिक वाचनालय आयोजित, 57 व्या जिल्हा स्तरीय साहित्य संमेलन मध्ये, सुहास टिपरे, जेष्ठ साहित्यिक यांचा विशेष संमेलन व्यासपीठावर सन्मान करण्यात आला. संमेलन अध्यक्ष श्री प्रकाश होळकर, सुप्रसिद्ध ग्रामीण कवी यांच्या शुभ हस्ते श्री सुहास टिपरे यांच्या गत वर्षात विविध साहित्य प्रकाशित झाले,त्या साहित्यिक सेवेचा सन्मान सुहास टिपरे यांना सन्मान चिन्ह व पुष्प देऊन श्री प्रकाश होळकर यांनी गौरव केला आहे या प्रसंगी संमेलन व्यासपीठावर सुहास टिपरे यांचे स्वागत सार्वजनिक वाचनालय अध्यक्ष श्री दिलीप फडके, उप अध्यक्ष डॉक्टर सुनील कुटे, उप अध्यक्ष डॉक्टर विक्रांत जाधव, कवी संमेलन अध्यक्ष श्री राजू देसले, कार्याध्यक्ष संजय करंजकर, मुख्य सचिव गिरीश नातू, व सांस्कृतिक सचिव जयप्रकाश जातेगांवकर यांनी केलें आहे. संमेलन व्यासपीठावर, सार्वजनिक वाचनालय ने साहित्य सेवेची दखल घेऊन, सन्मान केल्या बद्दल सुहास टिपरे यांनी वाचनालय व सर्व संस्था यांचे आभार मानून आनंद व्यक्त केला आहे!!

