
महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू डॉ. विलास खर्चे सर यांच्या प्रेरणेने आणि विद्यापीठाचे संशोधन संचालक आदरणीय डॉ. प्रशांत बोडके सर यांच्या मार्गदर्शनाखाली सेवा संकल्प अभियान – 2026 अंतर्गत श्रम- साफल्य शेतकरी शास्त्रज्ञ मंचाचे रब्बी पूर्व हंगाम नियोजन बैठक व चर्चासत्राचे यशस्वी आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन मा. डॉ. श्री प्रशांत बोडके साहेब, शेतकरी शास्त्रज्ञ मंचाचे अध्यक्ष श्री वैकुंठ पाटील तसेच निसाकाचे माजी चेअरमन श्री माणिकराव बोरस्ते, उपविभागीय कृषी अधिकारी श्री भटू पाटील, सहयोगी संशोधन संचालक डॉ.अविनाश कोळगे, प्रभारी अधिकारी डॉ. रवींद्र पाटील, डाळिंब संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ. सचिन हिरे विशेषज्ञ प्रा. भालचंद्र मस्के, कृषी अधिकारी श्री संदीप मोगल पंचायत समिती निफाड आदी उपस्थित होते.
संशोधन संचालक, डॉ. प्रशांत बोडके यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना विद्यापीठाचे तंत्रज्ञान, विद्यापीठाने विकसित केलेले विविध वाण, विद्यापीठाच्या निविष्ठा त्यांचा वापर यावर प्रामुख्याने भर दिला गहु वाण त्र्यंबक, निफाड ३४, फुले समाधान चपातीच्या रुपाने, इंद्रायणी चा भात, ज्वारीत मालदांडी ची उत्तम भाकरी तसेच बाजरीचे श्रद्धा आणि सबुरीची भाकरी, फुले २६५ आणि ८६०३२ ऊसाची साखर, तसेच फुले समर्थ कांदा, उत्तम डाळिंब फुले भगवा या प्रमाणे विविध धान्य , फळे आणि भाजीपाला शेतकरी वर्गात प्रसिद्ध आहे आणि हे महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे असून घरोघरी प्रचलित असल्याचे नमुद केले. त्यांनी जमिनीचे आरोग्य टिकवण्यासाठी सेंद्रिय निविष्ठा त्याच बरोबर विद्यापीठाने विकसित केलेले फुले बायो मिक्स तसेच इतर जैविक कीटकनाशके बुरशीनाशके वापरण्यासाठी मार्गदर्शन केले . त्याचबरोबर नैसर्गिक शेती, सेंद्रिय शेती तसेच एकात्मिक शेती पद्धती, पाण्याचा गरजे नुसार वापर विद्यापीठाने विकसित केलेले तंत्रज्ञान राबवल्यास शाश्वत उत्पादन मिळू शकते.
चर्चासत्रात संशोधन केंद्राचे सहयोगी संशोधन संचालक डॉ. अविनाश कोळगे यांनी रब्बी हंगामात घ्यावयाची पिके आणि त्यांचे नियोजन यावर माहिती दिली. द्राक्षे आणि कांदा संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. रवींद्र पाटील यांनी द्राक्ष आणि कांदा यावर मार्गदर्शन केले . डाळिंब संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ. सचिन हिरे यांनी डाळिंब व्यवस्थापनावर मार्गदर्शन केले. गहू विशेषज्ञ प्रा. भालचंद्र म्हस्के यांनी कीड व्यवस्थापन व जैविक निविष्ठांचा वापर डॉ. पोपट खंडागळे यांनी रोग व्यवस्थापन तर डॉ. निलेश मगर यांनी गहू पिकाचे सुधारित वाण यावर मार्गदर्शन केले. उपस्थित शेतकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना तज्ञांनी समर्पक उत्तरे देऊन त्यांना मार्गदर्शन केले. कृषी विभागाच्या वतीने श्री भटू पाटील यांनी शासनाच्या विविध योजनाबाबत माहिती दिली तर श्री संदीप मोगल यांनी एफ एफ एस या खत खरेदी ॲप विषयी सविस्तर माहिती दिली. श्री सचिन मोगल यांनी शेतकऱ्यांच्या वतीने मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमासाठी शेतकरी शास्त्रज्ञ मंचचे सदस्य तसेच कसबे सुकेणे मोजे सुकेणे येथील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदर कार्यक्रम श्री शामराव मोगल यांच्या शेतावर घेण्यात आला. श्री मोगल यांच्या नैसर्गिक शेती च्या प्लॉटला भेट देण्यात आली तसेच ते बनवत असलेल्या नैसर्गिक निविष्ठा केंद्राला भेट देण्यात आली. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉ. निलेश मगर तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.भरत मालुंजकर यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संशोधन केंद्राचे श्री बाळू झडे, राजेंद्र लोखंडे वरिष्ठ संशोधन सहाय्यक, तसेच कृषी सहाय्यक श्री संजय वाघ, श्री अनिल पाटील, श्री चंद्रकांत बेलदार, श्री रवींद्र गांगुर्डे, श्री सागर रावते यांनी सहकार्य केले.

