
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३४२९ वा दिवस
आजचा वाढदिवस


संसारातील शेकडो विचारांनी माझ्या मनात ठाण मांडले होते. एक प्रहर उलटल्यानंतर ठाकुरांनी मला दक्षिणेश्वरीच्या कालीमातेच्या मंदिरात जाण्यास सांगितले. स्थिर विश्वासामुळे इतर सर्व विषयांचा विसर पडून माझे मन अत्यंत एकाग्र व तन्मय झाले आणि त्याच गोष्टीचा विचार करू लागले. मंदिरात उपस्थित झाल्यावर बघितले की जगन्माता खरोखरीच चिन्मयी आहे, ती जिवंत आहे आणि अनंत प्रेमाचे व सौंदर्याचे ती उत्पत्तिस्थान आहे. भक्तीने व प्रेमाने हृदय उचंबळू लागले; विव्हल होऊन वारंवार प्रणाम करीत म्हणू लागलो, ‘आई मला विवेक दे, वैराग्य दे, ज्ञान दे, भक्ति दे असे करून दे की मला तुझे नेहमी अबाधित दर्शन लाभेल.’ हृदय शांतीने भरून गेले. सर्व जग पूर्णपणे अदृश्य होऊन एकमात्र मातेच्या तेजस्वी रुपाने हृदय व्यापून गेले.
स्वामी विवेकानंद...
आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो
★ भारतीय सौर अश्विन इषमास २८ शके १९४८
★ अश्विन शुक्ल /शुध्द ९
★ शालिवाहन शके १९४८
★ शिवशक ३५१
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ विक्रम (रौद्र) संवत्सर २०८३
★ मंगळवार दि. २० ऑक्टोबर २०२६
★ विजया दशमी, 'दसरा' सिमोलंघन
★ शस्त्रपूजन, अश्वपूजन, शमीपूजन
★ १९१६ लोकशाहीर मेहबूब हुसेन पटेल ऊर्फ ’शाहीर अमर शेख’ यांचा जन्मदिन
★ १९६९ डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची अकोला येथे स्थापना
★ १९७४ प्रतिभावान गायक, अभिनेते व संगीतकार कृष्णाजी गणेश फुलंब्रीकर तथा मास्टर कृष्णराव यांचा स्मृतिदिन.
★ १९९५ समाजवादी नेते, स्वातंत्र्यसैनिक, पत्रकार मधू लिमये यांचा स्मृतिदिन.
★ १९९६ युद्धशास्त्राचे अभ्यासक, पत्रकार दि. वि. तथा बंडोपंत गोखले यांचा स्मृतीदिन
★ जागतिक सांख्यिकी दिन.
★ प्रभु रामचंद्रांचा आदर्श घेऊन, रावणरूपी अहंकाराचा नाश करत, आपण सारे मिळून सिमोलंघन करूया. विजयादशमीच्या आपणांस व आपल्या परिवारास मंगलमय हार्दिक शुभेच्छा…

