
नाशिक:-( प्रतिनिधी ) हीरक महोत्सवाकडे वाटचाल करणाऱ्या मखमलाबाद येथील ग्रंथमित्र रामचंद्र अर्जुन काकड (सर) सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने रविवार दि.२५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वा. रौप्यमहोत्सवी ‘काव्यकोजागिरी’ या खुल्या कविसंमेलनाचे आयोजन वाचनालयाचे अध्यक्ष रामदास किसन पिंगळे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले आहे. या उपक्रमाचे हे पंचवीसावे वर्ष आहे.
गेली पंचवीस वर्षे सातत्याने संपन्न होणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील नव्याजुन्या कवींसह या कविसंमेलनात परिसर आणि जिल्ह्यातील मान्यवर कवी उपस्थित राहणार आहेत. कविसंमेलनात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या कवींनी ग्रंथपाल ग्रंथमित्र राजेश शिरसाठ (९९२१३५०९५८) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन वाचनालयाच्या संचालक मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

