
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३४३२ वा दिवस

आपण महान कार्य करण्यासाठीच जन्माला आलो आहोत. स्वतःच्या सर्वशक्तीमत्वाच्या, स्वतःच्या महिम्याच्या, स्वतःच्या गौरवाच्या चिंतनाने स्वतःला भरून टाका. खुळचट समजूती तुमच्या डोक्यात कधीच कोंबल्या गेल्या नसत्या तर किती चांगले झाले असते! स्वतःविषयीच्या दुर्बलतेच्या आणि निच्चतेच्या कल्पना माणसाला खच्ची करून टाकतात. ह्या असल्या खचविणाऱ्या कल्पनांनी आणि खुळचट समजुतींनी आपण जीवनात कधीच घेरले गेलो नसतो तर किती उत्तम झाले असते! स्वतःला कदापि कमजोर समजू नका, नकारात्मक विचारांपासून सदैव दूर राहण्याचा प्रयत्न करा. तुम्ही स्वतःच्या अफाट शक्तीवर आणि सामर्थ्यावर जितका जास्त विश्वास ठेवाल, तितकेच तुमचे जीवन अधिक यशस्वी, आनंदी आणि गौरवास्पद होईल.
*स्वामी विवेकानंद...*
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर कार्तिक उर्जमास १ शके १९४८
★ अश्विन शुक्ल /शुध्द १२
★ शालिवाहन शके १९४८
★ शिवशक ३५१
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ विक्रम (रौद्र) संवत्सर २०८३
★ शुक्रवार दि. २३ ऑक्टोबर २०२६
★ हेमंत ऋतू प्रारंभ
★ १७७८ कित्तूरची राणी, रणरागिणी चन्नम्मा यांचा जन्मदिन
★ १९२१ वाहनांच्या रबरी धावांच्या आत हवा भरलेली नळी (Tube) वापरण्याच्या तंत्राचा शोध लावणारे स्कॉटिश संशोधक जाॅन बाॅईड डनलाॅप यांचा स्मृतीदिन
★ १९२३ वैदिक धर्माचे पुरस्कर्ते, पाश्चात्य व पौर्वात्य तत्वज्ञानाचे गाढे अभ्यासक, मीमांसक व भाष्यकार शंकर रामचंद्र तथा ‘अहिताग्नी’ राजवाडे यांचा जन्मदिन.
★ १९२४ संगीतकार गायक, अभिनेते संगीतभूषण पंडित राम मराठे यांचा जन्मदिन.

