
नाशिक (प्रतिनिधी )काही प्रवास अंतराने मोजले जातात तर काही प्रवास अंतरंगात उठलेल्या भावभावनांनी शब्द कागदावर उमटतात.असे भावोत्कट उद्गार लेखिका सविता पोतदार यांनी काढले.गिरणा गौरव प्रतिष्ठान आयोजित पुस्तकावर बोलू काही या गौरवशाली परंपरा असलेल्या उपक्रमातील 316 व्या भागात त्या बोलत होत्या.पुढे त्या म्हणाल्या की सचिन तेंडुलकर यांनी मैदानात प्रवेश करावा आणि पहिल्याच बॉलला सिक्सर ठोकावा त्याप्रमाणे पहिलीच शीर्षक कथा सदू आणि स्वातंत्रदिन ही भन्नाट कथा त्यांनी सादर केली.महिलामुक्ती मधून समाजातील वास्तवावर त्यांनी आसूड ओढला.बायकोची वापसी हा घरोघरी चालणारा नवरा बायकोतील संवाद अगदी विनोदी पद्धतीने सादर केला

.स्वर्गात वटसावित्री,सौजन्याची ऐशीतैसी, अन्नाचे उपोषण,सरकारी फतवा,साहित्यिकांची घराणेशाही अशा विविध कथांचे खुमासदार शब्दांत विवेचन केले.या उपक्रमाच्या अध्यक्षस्थानी इंजिनिअर वाळू आहेर हे होते.साहित्यिक मधुकर गिरी यांच्या हस्ते लेखिकेचा सन्मान करण्यात आला.भाग्यवान विजेते म्हणून सुजाता येवले व लीना जोशी यांना ग्रंथभेट देण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रपती पुरस्कार विजेते लेखक अशोक कुमावत यांनी तर आभार साहित्यिक राजेंद्र देसले यांनी मानले.दिनांक 27 ऑक्टोबर येत्या मंगळवारी नलिनी बागुल या त्यांच्या पुस्तकावर विवेचन करणार आहे.

