
विंचूर (हनुमान नगर) / गुंजाळवाडी : विंचूर अर्थात हनुमान नगर तसेच गुंजाळवाडी गावचे सुपुत्र आणि निफाड न्यायालयातील प्रख्यात वकील अॅड. किरण गुंजाळ यांची निफाड बार संघाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांच्यावर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या या निवडीमुळे विंचूर आणि गुंजाळवाडी परिसराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
अॅड. किरण गुंजाळ हे स्वर्गीय काकासाहेब गुंजाळ यांचे पुतणे असून, निफाड न्यायालयातील ज्येष्ठ वकील गुंजाळ साहेब यांचे चिरंजीव आहेत. आपल्या वकिली व्यवसायातील अनुभव, कार्यतत्परता आणि सामाजिक बांधिलकीच्या जोरावर त्यांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. निफाड बार संघाच्या अध्यक्षपदी झालेली त्यांची निवड ही त्यांच्या कार्याची पोचपावती मानली जात आहे.

