
नाशिकरोड:- ( प्रतिनिधी )पळसे येथील नासाका कार्यस्थळावरील माध्यमिक विद्यालयात दीपावलीनिमित्त आयोजित आकाशकंदील, भेटवस्तू आणि पणत्या निर्मिती कार्यशाळेतील उत्कृष्ट वस्तू तयार करणाऱ्या विद्यार्थ्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली. नासाकाचे अवसायक प्रदीप आव्हाड, नाशिक सर्व सेवाभावी ट्रस्टचे मानद व्यवस्थापक सुधाकर गोडसे यांच्या प्रेरणेने आणि मुख्याध्यापक अरुण पगार, शिक्षक-कर्मचारी यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झालेल्या कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. श्रद्धा संतोष सानप, ईशा विजय ढाकरके, ईशा संदीप वाकचौरे, तेजश्री केशव माळी, धनश्री अनिल शिंदे, कल्याणी योगेश गोसावी, सर्वेश तुकाराम सानप, आयुष विजय पानसरे, सृष्टी महेश आडके, पायल उत्तम सानप, दूर्वा नवनाथ उगले, आर्या सचिन आडके, पूर्वा दत्ता मोरे, मानसी संदीप वाकचौरे, लावण्या भिका सानप आणि साई साहेबराव कोळी या उत्कृष्ट वस्तू बनवणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षकांसह पालक सारंगधर आहेर यांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली.

