
नांदगाव ( प्रतिनिधी ) कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, नांदगावचे प्राचार्य डॉ.एन.यु.पाटील यांच्या मार्गदर्शनाने ‘राष्ट्रीय सेवा योजना विभाग’ व ‘विद्यार्थी कल्याण मंडळाच्या’ वतीने ‘मुख्यमंत्री आरोग्य संवाद-जागर आरोग्याचा’ उपक्रमांतर्गत व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.

सदर प्रसंगी कार्यक्रमाचे व्याख्याते महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.एस.ए. मराठे यांनी विद्यार्थ्यांना सुदृढ व निरोगी निरामय आरोग्य प्राप्तीसाठी नियमित व्यायाम, योगा व मैदानी खेळ खेळण्यावर भर द्यावा. व्यसनांपासून दूर राहावे तसेच मोबाईलचा अतिरिक्त वापर केल्यानेही आरोग्यावर दुष्परिणाम होतो यासंदर्भात विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली.समाजात वावरताना व्यसनांच्या आहारी गेलेल्या लोकांचे समुपदेशन करावे व समाज बांधवांच्या व्यसनमुक्तीसाठी युवकांनी कटिबद्ध राहण्याचे याप्रसंगी आवाहन केले. महाविद्यालयाच्या विद्यार्थी कल्याण मंडळाचे समन्वय

प्रा. डॉ. स्वप्निल शेंडगे यांनी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून ‘मुख्यमंत्री आरोग्य संवाद – जागर आरोग्याचा’ या उपक्रमाची सविस्तर माहिती दिली.
सदर प्रसंगी मंचावर कनिष्ठ महाविद्यालयाचे विभाग प्रमुख प्रा.जी. व्ही.बोरसे, प्रा.बालाजी मोरे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रासेयो+२ स्तरचे कार्यक्रम अधिकारी प्रा.बी.के.पवार यांनी केले.आभार प्रदर्शन रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ.बी.एम.अहिरे यांनी केले. कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक उपस्थित होते.

