
( प्रतिनिधी आशा रणखांबे )
बडोदा दि.२३ रविवार दि. २५ ऑक्टोबर २०२६ रोजी सोवेरिन रेस्टारेंट , जुना छाणी, स्टेशन रोड,बडोदा येथे हिंदी, गुजराती आणि इंग्रजी भाषेतील चार पुस्तकांचे प्रकाशन मराठी - हिंदी साहित्यिक प्रा. दामोदर मोरे यांच्या हस्ते होणार आहे.या सुंदर सोहळ्याचे अध्यक्षस्थान पश्चिमांचल हिंदी प्रचार समितीचे प्रमुख हिंदी - गुजराती साहित्यिक डॉ. माणिक मृगेश हे स्वीकारणार आहेत.
प्रसिद्ध हिंदी - गुजराती लेखक, माजी हिंदी विभाग प्रमुख डॉ.आर.एच.बणकर ' स्नेहस्वरुप' लिखित ' कबीर की अमूल्य वाणी' , माधोदास मुंदडा लिखित 'सुखी जीवन' या हिंदी पुस्तकाचा डॉ आर एच बणकर यांनी गुजराती भाषेत केलेल्या अनुवादाचे पुस्तक ' सुखी जीवन ', डॉ.सुरेंद्र परमार यांनी जयप्रकाश नवेंदू यांच्या हिंदी पुस्तकाच्या इंग्रजीत केलेल्या अनुवादाचे An Angel in India आणि माधोदास मुंदडा यांच्या हिंदी पुस्तकाच्या गुजराती भाषेत केलेल्या अनुवादाचे पुस्तक रसो वै स: अशा चार पुस्तकांचे प्रकाशन होणार आहे.
या शानदार पुस्तक लोकार्पण समारंभाचे सूत्रसंचालन पश्चिमांचल हिंदी प्रचार समितीच्या सचिव डॉ.राखी सिंह कटियार करणार असून या प्रसंगी होणार्या कवी संमेलनात नामवंत गुजराती - हिंदी कवी सहभागी होणार आहेत.या कार्यक्रमास बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन डॉ.आर.एच.बणकर आणि डॉ.सुरेंद्र परमार यांनी केले आहे.

