
(नाशिक)संत साहित्याचे अभ्यासक आणि मार्गदर्शक सूर्यकांत शंकर धटिंगण यांचे नुकतेच दुखःद निधन झाले.ते 85 वर्षांचे होते.
विश्वसंत नामदेव गाथेचा प्रचार आणि प्रसारासाठी त्यांनी मोलाचे कार्य केले.
पंढरपूर येथील संत नामदेव सेवा मंडळ समूहाशी त्यांचा विशेष स्नेह होता.
जीवन गौरव, नामदेव गाथाव्रती सारख्या अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांचे ते मानकरी ठरले.
एच ए एल येथून निवृत्ती पश्चात त्यांनी आध्यात्मिक कार्यास संपूर्णत: वाहून घेतले आणि संत साहित्य अभ्यासकांचा मोठा समूह उभा केला.
या कार्यात त्यांच्या सुविद्य पत्नी मीनाक्षी धटिंगण यांची मोलाची साथ लाभली.त्यांच्यामागे दोन मुले, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
विविध विषयावर त्यांनी केलेले विपुल लेखन अभ्यासकांना संदर्भासाठी उपयुक्त ठरते आहे. त्यांच्या अभंगामृत या ग्रंथास जाणकारांचा विशेष प्रतिसाद लाभला.
दासबोध मंडळाचे पण ते सक्रिय सदस्य होते.
अतिशय व्यासंगी, निगर्वी आणि कलासक्त असलेले एक निर्मळ व्यक्तिमत्व आज काळाच्या पडद्याआड गेले अशी भावना मान्यवरांनी व्यक्त केली आणि त्यांनी सुरू केलेले हे आध्यात्मिक कार्य आणखी जोमाने पुढे नेणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे मत व्यक्त केले.
या प्रसंगी आध्यात्मिक, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, उद्योग, वित्त क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

