
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३४३३ वा दिवस

सर्व प्रकारची शुभ कर्मे ही आपल्या ठायी असल्यास भक्तीचा लाभ होण्यास अप्रत्यक्षपणे सहाय्यभूत होत असतात. शुभ विचार आणि शुभ कर्म ही अशुभ विचार आणि अशुभ कर्म यापेक्षा कमी भेदबोध निर्माण करीत असतात आणि म्हणून ती आपल्याला अप्रत्यक्षपणे मुक्तीकडे घेऊन जातात. कर्म करा परंतु त्या कर्माचे फल भगवंताच्या चरणी अर्पण करा. केवळ ज्ञानात पूर्तता वा सिद्धावस्था लागू शकते जो भक्तीपूर्वक त्या सत्यस्वरूपी भगवंताची कास धरतो त्याला स्वतः तो सत्य स्वरूप भगवान स्वतःचे स्वरूप प्रकट करून दाखवतो. अहोरात्र सर्वदा सतत चांगले चिंतन करा असल्या अखंड अनुसंधानाने परिणामी अपूर्वक शाश्वत अनुभूतीचा लाभ होईल. भगवंताचे असे संपूर्णपणे सातत्यपूर्ण तन्मय स्मरण करण्यालाच भक्ती म्हणतात व भक्तीतूनच मुक्तीचा मार्ग आहे हे जाणून असा.
*स्वामी विवेकानंद...*
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर कार्तिक उर्जमास २ शके १९४८
★ अश्विन शुक्ल /शुध्द १२
★ शालिवाहन शके १९४८
★ शिवशक ३५१
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ विक्रम (रौद्र) संवत्सर २०८३
★ शनिवार दि. २४ ऑक्टोबर २०२६
★ १९१४ आझाद हिंद सेनेतील राणी झाशी रेजिमेंटच्या कॅप्टन लक्ष्मी सहगल यांचा जन्मदिन
★ १९२१ सुप्रसिध्द व्यंगचित्रकार पद्मविभूषण रासीपूरम कृष्णस्वामी ऊर्फ आर. के. लक्ष्मण यांचा जन्मदिन.
★ १९४५ संयुक्त राष्ट्र संघटना स्थापना दिन.
★ १९९२ मराठी नवकथेचे जनक अरविंद गोखले यांचा स्मृतीदिन
★ १९९५ पत्रकार, भारतीय श्रमिक पत्रकार संघटनेचे अध्यक्ष माधवराव साने यांचा स्मृतीदिन
★ २०१३ पार्श्वगायक प्रबोधचंद्र तथा मन्ना डे यांचा स्मृतीदिन
★ जागतिक पोलिओ निर्मूलन दिन.
★ जागतिक माहिती विकास दिन.

