
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३४३४ वा दिवस

आपल्या धर्मग्रंथातून वैश्विक समतेचा सिद्धांत प्रतिपादिलेला आहे, परंतु प्रत्यक्ष कार्यात आपण पुष्कळच भेदाभेद पाळतो. भारतात अत्युच्च प्रकारच्या निःस्पृह आणि निःस्वार्थ कार्याचा महिमा उपदेशिला गेला आहे, परंतु प्रत्यक्ष व्यवहारात आपण भारतीय अत्यंत निर्घृण, अत्यंत निर्दयी बनतो. व्यवहारात आपल्या रक्तामासाच्या शरीरापलीकडे आपण विचारच करू शकत नाही. कित्येक गोष्टी अद्याप आपल्याला करावयाच्या आहेत, परंतु आवश्यक त्या साधनांचा देशात अभाव आहे. आपल्यापाशी बुद्धिमत्ता आहे, पण कर्मशीलता नाही. वेदांत तत्वज्ञान आहे, परंतु ते व्यवहारात उतरविण्याचे सामर्थ्य आपल्यात नाही. प्रत्येक भारतीयांने आपल्या अंगी असलेला आळसपणा आणि ढोंगीपणा सोडून प्रत्यक्ष राष्ट्र उभारणीच्या कार्याला झोकून देऊन कार्याला लागण्याची आवश्यकता आहे.
*स्वामी विवेकानंद...*
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर कार्तिक उर्जमास ३ शके १९४८
★ अश्विन शुक्ल /शुध्द १४
★ शालिवाहन शके १९४८
★ शिवशक ३५१
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ विक्रम (रौद्र) संवत्सर २०८३
★ रविवार दि. २५ ऑक्टोबर २०२६
★ कोजागिरी /शरद पौर्णिमा
★ आकाश दीपदान
★ १९५५ शास्त्रीय गायक पं. दत्तात्रय विष्णू तथा बापुराव पलूसकर यांचा स्मृतिदिन.
★ १९६० फर्ग्युसन कंपनी चे संस्थापक हॅरी फर्ग्युसन यांचा स्मृतीदिन
★ २००३ समाजसुधारक, रॅमन मॅगसेस पुरस्कार प्राप्त आध्यात्मिक गुरू, प्रवचनकार, कृतीशील विचारवंत, तत्त्वज्ञ. न्याय, वेदांत व्याकरण आदि शास्त्रांचा तौलनिक अभ्यास करणारे स्वाध्याय परिवाराचे प्रणेते पद्मविभूषण पांडूरंग शास्त्री आठवले यांचा स्मृतीदिन.

