
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३४३५ वा दिवस

कोणतेही कार्य, आंदोलन अथवा संघटनेचे परिपूर्ण शिक्षण देण्यासाठी अशी यंत्रणा वा व्यवस्था निर्माण करा की, जी व्यक्तीसापेक्ष नाही. कोणीही मरो, कोणीही उरो म्हणजे अमूक आला किंवा तमूक एक गेला यामुळे ती यंत्रणा वा व्यवस्था कदापि कोसळता कामा नये. आपण भारतीय स्थिर संघटना निर्माण करू शकत नाही याचे कारण आपल्या अधिकारात कोणी वाटेकरी आलेला आपल्याला खपतच नाही आणि आपण गेल्यानंतर या यंत्रणेचे काय व्हायचे, ती कोण, कशी चालवणार याचा आपण कधी विचारच करत नाही. यातून व्यक्तीपूजेला विशेष महत्त्व प्राप्त होते. हे राष्ट्र उभारणीच्या दृष्टीने धोक्याचे ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.
*स्वामी विवेकानंद...*
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर कार्तिक उर्जमास ४ शके १९४८
★ अश्विन पौर्णिमा
★ शालिवाहन शके १९४८
★ शिवशक ३५१
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ विक्रम (रौद्र) संवत्सर २०८३
★ सोमवार दि. २६ ऑक्टोबर २०२६
★ महर्षी वाल्मिकी जयंती
★ मिराबाई जयंती
★ १८९० भारतीय पत्रकार आणि राजकारणी गणेश शंकर विद्यार्थी यांचा जन्मदिन
★ १८९१ सहकार चळवळीचे प्रवर्तक वैकुंठभाई मेहता यांचा जन्मदिन.
★ १९३० प्लेग व कॉलरा प्रतिबंधक लशीचा शोध लावणारे सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ डॉ. वाल्डेमर हाफकिन यांचा स्मृतीदिन
★ १९३७ संगीतकार व गायक हृदयनाथ मंगेशकर यांचा जन्मदिन
★ १९४७ जम्मू आणि काश्मीरचे राज्य भारतात विलीन झाले.
★ १९५४ नाट्य आणि चित्रपट अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांचा जन्मदिन
★ १९९१ स्वातंत्र्यसैनिक, लेखक, पत्रकार, दैनिक ‘मराठवाडा’ चे संपादक, संयुक्त महाराष्ट्र चळवळ व हैदराबाद मुक्तीसंग्रामचे नेते अनंत काशिनाथ भालेराव यांचा स्मृतिदिन.

