
सिन्नर शाखेचे व्यवस्थापक सचिन गोडसे,महेश गायकवाड,शाखा सल्लागार डॉ.श्यामसुंदर झळके,आशुतोष सोनवणे इ.
सिन्नर/ प्रतिनिधी
येथील सूर्योदय संकुल मधील, दि नाशिकरोड देवळाली व्यापारी सहकारी बँक, सिन्नर शाखेचा 28 वा वर्धापन दिन उत्साहात संपन्न झाला. यावेळी बँकेचे खातेदार,ठेवीदार,हितचिंतक,कर्जदार तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शाखेला भेट देऊन शुभेच्छा दिल्या. बँकेचे ग्राहक ओमसाई मेडिकलचे संचालक राहुल झळके यांच्या हस्ते सर पत्नी सत्यनारायण पूजन करण्यात आले. बँकेचे व्यवस्थापक सचिन गोडसे यांनी उपस्थितांना बँकेच्या विविध योजनांची माहिती दिली.शाखेचे निमंत्रित शाखा सल्लागार डॉ.श्यामसुंदर झळके तसेच सूरज उगले यांचा सत्कार केला. लिपिक आशुतोष सोनवणे यांनी उपस्थितांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.यावेळी रोखपाल महेश गायकवाड कर्मचारी अशोक लाहोटी यांनी कार्यक्रम यशस्वितेसाठी प्रयत्न केले.
बँकेचे अध्यक्ष निवृत्ती अरिंगळे,ज्येष्ठ संचालक दत्ता गायकवाड यांनी वर्धापन दिनानिमित्त सिन्नर शाखेला भेट देऊन शुभेच्छा दिल्या व शाखेच्या कामकाजाबद्दल समाधान व्यक्त केले.


