
नाशिक | प्रतिनिधी
मनु मानसी महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, नाशिक यांच्यातर्फे देण्यात येणारा प्रतिष्ठेचा * नवदुर्गा महाराष्ट्र गौरव पुरस्कार २०२६* यावर्षी शिक्षण क्षेत्रातील कर्तृत्ववान महिला म्हणून पाताळेश्वर माध्यमिक विद्यालय, पाडळी, ता. सिन्नर येथील उपशिक्षिका सौ. सविता देशमुख यांना प्रदान करण्यात आला.
नाशिक येथे झालेल्या भव्य सोहळ्यात रोहिणीताई पिंगळे सभापती नगरसेविका पंचवटी विभाग नाशिक यांच्या हस्ते* हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून श्रीमती मंजुषा जाखडी, श्रीमती धनश्री गायधनी आणि संस्थेच्या पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
२८ वर्षांची अविरत शैक्षणिक सेवा
सौ. सविता देशमुख या गेल्या २८ वर्षांपासून पाताळेश्वर विद्यालयात उपशिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. केवळ अध्यापनापुरते मर्यादित न राहता त्यांनी महिला आणि मुलींच्या सक्षमीकरणासाठी अनेक उपक्रम राबविले आहेत.
त्यांच्या उल्लेखनीय कार्यात –
- १९९९ पासून सीमेवर लढणाऱ्या जवानांसाठी माता, पालक व विद्यार्थिनींच्या मदतीने १ लाखांपेक्षा जास्त राख्या पाठवून देशप्रेमाचा अनोखा आदर्श निर्माण केला.
- शाळांमध्ये माता पालक प्रबोधन मेळावे, कुमारवयीन जीवन कौशल्य, मुलींचे शिक्षण, शासकीय योजना, गुड टच-बॅड टच यावर व्यापक प्रशिक्षण दिले.
- आदिवासी मुलींना शाळेच्या प्रवाहात आणणे व त्यांना टिकवून ठेवण्यासाठी विशेष प्रयत्न.
- मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहांसह भौतिक सुविधा उपलब्ध करून घेतल्या.
- म्हाळुंगी नदी स्वच्छता प्रकल्प, हिंदी दिवस, वाचन प्रेरणा दिन, योग दिन, मुलींची नियमित आरोग्य तपासणी असे विविध उपक्रम सातत्याने राबविले.
- जागतिक महिला दिनानिमित्त कर्तृत्ववान महिलांचा सन्मान सोहळा आयोजित करणे.
त्यांच्या या सर्व कार्याची दखल घेत मनु मानसी संस्थेने त्यांना हा राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान केला आहे. यावेळी कीर्ती राजगुरू महाराष्ट्राची अखंड कन्या वास्तुतज्ञ ज्योतिष तज्ञ, आरती जैन मॉडेल ऍक्टर, सुचिता पाठक संचालक वस्तूची चविष्ट मसाले प्रिमिक्स पीठ चटण्या, श्रद्धा राजधर इंटरनॅशनल प्रोफेशनल सिनेमेकप स्कीन हेअर नेल आर्टिस्ट, प्रणिता तपकिरे प्रकल्प समन्वयक चाइल्ड हेल्पलाइन महिला व बालविकास अधिकारी कार्यालय नाशिक, मेघा शिंपी संस्थापिका अध्यक्षा, मंजुताई जाखडी कार्याध्यक्ष, धनश्री गायधनी कार्याध्यक्षा प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या . पुरस्कार मिळाल्याबद्दल शिक्षक आमदार किशोर भाऊ दराडे व पदवीधर आमदार सत्यजित दादा तांबे डॉ सुधीरजी तांबे देशमुख एस बी सचिव महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघ, गणेश जाधव ग्लोरियल इंग्लीश मेडीयम स्कुल इगतपुरी , घोटेकर भागिनाथ मार्गदर्शक मुख्याध्यापक संघ, शामल पाटील मॅडम यांनी सविता देशमुख यांचे खास कैतुक केले .
सर्व स्तरातून कौतुक
नाशिक जिल्ह्यातून शिक्षण क्षेत्रात सौ. सविता देशमुख यांची झालेली ही निवड योग्य व सार्थ असल्याची भावना शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांनी व्यक्त केली. त्यांच्या कार्यामुळे ग्रामीण भागातील मुलींच्या शिक्षणाला नवी दिशा मिळाली असून त्या अनेकांसाठी प्रेरणास्थान ठरल्या आहेत.
या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

