
नांदगाव – येत्या दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आपली खरेदी स्थानिक बाजारपेठेतून करावी कारण आपल्या सुख दुःखाला आणि अडचणीला स्थानिक दुकानदार भूमिपुत्रच आपणास उपयोगी पडतो प्रसंगी उधारी देणे , स्थानिक सणउत्सवास देणगी देणे, कोरोना सारख्या प्रसंगी ऑनलाइन सर्व सेवा बंद असताना आपल्या गावातील शहरातील दुकानदारच उपयोगी पडलेला आहे ऑनलाइन खरेदीचा वापर टाळून स्थानिक बाजारपेठेत खरेदी करा असे आवाहन भाजपा व्यापारी आघाडीचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख दत्तराज छाजेड यांनी केले वरील आशयाच्या जनजागृती पत्रकाचे उद्घाटन पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते करण्यात आले संपूर्ण उत्तर महाराष्ट्रा मध्ये व्यापारी आघाडीच्या वतीने हे अभियान राबविण्यात येणार आहे. याप्रसंगी प्रदेश प्रवक्ते लक्ष्मणराव सावजी, महापौर हिम गौरी आडके नाशिक भाजपा महानगर प्रमुख सुनील केदार नांदगाव तालुका अध्यक्ष संजय सानप आरपीआय तालुका अध्यक्ष राजाभाऊ पवार आदि मान्यवर उपस्थित होते

