
सिन्नर ( प्रतिनिधी ) लोकशाहीर.भिमाजी नाना भाटजीरे यांच्या 22 व्या स्मृतीदिनानिमित्त कलगीतुरा या लोककलेचे सादरीकरण उत्साहात पार पडले.
लोकशाहीर.भिमाजी भाटजीरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त दरवर्षी कलगीतुरा ह्या लोककलेचे सादरीकरण त्यांचे कुटुंब आणि पंचक्रोशीतील सहकारी कलाकार मोठ्या उत्साहात करत असतात.
भाटजीरे यांचा हा वारसा त्यांचे जेष्ठ चिरंजीव श्री रंगनाथ भिमाजी भाटजीरे उत्तम प्रकारे सांभाळत आहेत तर त्यांचा नातू अभिजीत शिवाजी भाटजीरे यांनी शास्त्रीय संगीतातून तीन पिढ्यांचा वारसा चौथ्या पिढीत वृद्धिंगत केला आहे, असे प्रतिपादन निवृत्त नायब तहसीलदार श्री दत्ता वायचळे यांनी केले.

दरवर्षी भिमाजी नाना यांचे कुटुंबीय व मुले रंगनाथ भाटजीरे, संजय भाटजीरे, शिवाजी भाटजीरे आणि गोपीनाथ भाटजीरे
सगळे मिळून हा कार्यक्रम मोठ्या जबाबदारीने पार पाडता.
कार्यक्रमात जिल्ह्यातील नामवंत शाहिरांनी भाग घेऊन उत्कृष्ट कवणे सादर केली. शाहीर श्री रंगनाथ भाटजीरे, सखाराम नन्ने, उत्तम जाधव यांच्या कवणांनी लक्ष वेधले. तसेच विष्णू गुगळे (सुळेवाडी), लालजी म्हस्के (सुळेवाडी), रघुनाथ गोळेसर, भगवान घोडे, यमाजी कडभाणे, भाऊसाहेब एरंडे, वामन झाडे, नामदेव गोफणे, आण्णा कर्डक, विठ्ठल कदम या नामवंत शाहिरांनी उत्तम कवने केली.
दरम्यान श्री रंगनाथ लोणारे, विजू गोळेसर, संजय लोणारे, राजेंद्र लोणारे इत्यादी पाहुणे कार्यक्रमास हजर होते.
गेल्या 55 ते 60 वर्षांपासून दर नागपंचमीला वरदी परशराम व कलगीतुऱ्याचा हा कार्यक्रम ही कलाकार मंडळी करत असतात.
भाटजीरे परिवाराने कलेचा ध्यास घेतला असून या कलेला लोकाश्रय मिळावा या प्रयत्नात ते सदैव राहतील…

