
*९ सिन्नर (प्रतिनिधी) जागतिक आदिवासी दिन उत्सव समिती व आदिवासी संस्कृती संवर्धन मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात आला.आदिवासी क्रांतिकारक महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना पुष्पहार अर्पण करण्यात आले.

त्यांच्या कार्याच्या आठवणींना उजाळा देण्यात आला.हुतात्मा स्मारक स्थळी आदिवासी क्रांतिकारकांच्या प्रतिमेला प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. *या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदि.अशोक मोरे होते* *याप्रसंगी कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे नगराध्यक्ष विठ्ठल उगले माजी नगराध्यक्ष किरण भाऊ डगळे ,महामित्र दत्ता वायचळे, कॉम्रेड हरिभाऊ तांबे ,शरद पवार राष्ट्रवादी गटाचे नेते राजाराम मुरकुटे , नगरसेवक अनिल सलवार, यांनी आपले मनोगत व्यक्त केले.* जगात पहिला मानव व या देशाचा मुळ मालक हा आदिवासी आहे.जल जमीन जंगल यावर आदिवासींचा अधिकार आहे.आदिवासी हा निसर्गाच्या सानिध्यात राहतो आणि निसर्गाला देव मानतो आपली आदिवासी संस्क्रुती जपतो.माणूस जस जसा प्रगत होत चालला आहे तस तशी निसर्गाची हानी होत आहे. औद्योगिकीकरण विकासामुळे पर्यावरणाचा -हास होत चाललेला आहे त्यामुळे आदिवासींचं अास्तित्व धोक्यात आलं आहे. आदिवासींच्या जल जमीन जंगल यांच्या अधिकारासाठी अनेक आदिवासी क्रांतिकारकांनी आपल्या प्राणाचं बलिदान दिलं

आहे.आदिवासींचं आस्तित्व अभादित रहावा निसर्गाची हानी रोकण्यासाठी आदिवासी वाचला संयुक्त राष्ट्र संघाने (UNO) २३ डिसेंबर १९९४ ला ठराव करून जागतिक आदिवासी दिन (International Day of the world Indigonus people) ९ आँगष्ट १९९५ रोजी साजरा करण्यात आला.आज जगात १९३ च्या वर देशांमध्ये जागतिक आदिवासी दिन साजरा होत आहे.भारत सरकारने याची दखल घेऊन शासकिय पातळीवर जागतिक आदिवासी दिन साजरा करावा व शासकिय सुट्टी जाहिर करून आदिवासी समाजाला न्याय द्यावा. अशी मागणी यावेळी करण्यात आली.जागतिक आदिवासी दिनानिमित्त सिन्नर तालुक्यात विविध सांस्कृतिक सामाजिक आणि जन जागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. सिन्नर शहरामध्ये जागतिक आदिवासी दिनाचे सालाबादप्रमाणे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. *हुतात्मा स्मारक येथे भगवान एकलव्य रथाचे पुजन करुन आदिवासी शोभायात्रेची सुरवात केली. महात्मा फुले चौक महात्मा ज्योतिराव फुले यांचं स्मारक , छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास व भगवान एकलव्य यांच्या पुतळ्यास तर डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास आदिवासी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. रॅली या मार्गाने पुढे जात तहसील कार्यालयाशोजारी असलेल्या आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे, उमाजी राजे नाईक व सिन्नर तालुक्याचे भुमिपुत्र क्रांतिवीर भागोजी नाईक यांच्या स्मारक या ठिकाणी आली.व क्रांतीस्थळवरती शिल्पास (त्रिशिल्प) सर्व आदिवासी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.**या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देवराम खेताडे सर यांनी केले तर प्रास्ताविक विजय मुठे यांनी केले व आभार विजय बर्डे यांनी मानले.* या कार्यक्रम यशस्वीतेसाठी मा.नगरसेवक रुपेश मुठे, जनार्दन कुंदे आकाश बर्डे,किरण मोरे, देवराम खेताडे ,विठ्ठल खोकले, विजय मुठे, रामु इदे व जागतिक आदिवासी दिन उत्सव समिती सिन्नर,आदिवासी संस्कृती संवर्धन मंडळ, सिन्नर व सर्व समविचारी संघटना यांनी केलेया कार्यक्रमासाठी उपस्थित यमुनाताई भांगरे विनोद शिताळे,सजन सांगळे, बाळासाहेब घुगे विजय बर्डे बाळासाहेब सदगीर वेदांत काळे निवृत्ती भांगरे रामू इदे, लक्ष्मण तळपे राजेंद्र बेंडकुळे प्रकाश मदगे श्याम कुंदे राहुल भांगरे अमोल गवारी भीमा मदगे सागर खेताडे समाधान खेताडे नामदेव मजकुले मोठ्या संख्येने आदिवासी बांधव महिला व मुला मुली सामाजिक राजकीय कामगार वर्ग सहभागी होते.

