
नाशिक जिल्हा प्रतिनिधी – नवनाथ गायकर यांजकडुन —
घोटी हुन आहुर्ली – सांजेगाव मार्गे नाशिक शहराला जाण्यासाठी मुक्कामी बस सोडल्यानंतर एक ही बस नसल्याने येथील विदयार्थी, कामगारांसह प्रवाशाचीं मोठी गैरसोय होत असुन या मार्गे तातडीने बसेस सोडावी अशी मागणी प्रवाशी करत आहे. आहुर्ली, सांजेगाव या मार्गे वाडिवर्हे व नाशिक येथील प्रवाशानां जवळ आहे.व या मार्गावर प्रवाशाचीं मोठी ये जा सुरु असते. मात्र या मार्गावर सकाळी ६ वाजता जाणारी बस सोडली तर एकही बस नाही. पुर्वी या मार्गे सकाळी ८ वा. नाशिक ला जाणारी बस होती. त्यानंतर दुपारी १२ वा. बस होती. व त्यानंतर मानव विकासची दु.२ ला इगतपुरी आगारातुन सुटणारी शालेय बस फेरी मानव विकास ची बस नाशिक जात असे. मध्यतंरीच्या कालखंडात या सगळया बसेस बंद करण्यात आल्या असल्याने नाशिक जाणे साठी प्रवाशानां दुप्पट पैसे मोजुन एकतर घोटी जाऊन नाशिक किंवा त्रंबकेश्वर जाऊन नाशिक असा फेरा मारावा लागतो आहे. यात वेळ, पैसा याची हानी होते.किंवा मग नाईलाजाने खाजगी वाहनाचां आधार घ्यावा लागतो. हा भाग अतिदुर्गम, मागास व आदिवासी बहुल असुन या ठिकाणाहुन अनेक विदयार्थी शिक्षणासाठी नाशिक ला ये जा करतात.तसेच अनेक तरुण एम आय डी सी वाडिवर्हे, गोंदे, अंबड व सातपुर ला कामासाठी जा ये करतात. नाशिक जिल्हयाचे ठिकाण असल्याने अनेकानेक शासकिय कामासाठी नागरिक नाशिक जात येत असतात. पण या मार्गावर बसच नसल्याने या भागातील शेकडो प्रवाशाचें हाल होत आहेत. दरम्यान या मार्गावर पुर्वीची दु. २ वा. इगतपुरी आगारातुन सुटणारी कुशेगाव मुक्काम ही बस फेरी पुन्हा पुर्ववत सुरु करावी.ही बस मानव विकास ला जोडलेली असल्याने या मार्गावरील शालेय विदयार्थ्याचीं सोय होईल. तसेच आहुर्ली -सांजेगाव मार्गे नाशिक जाऊन पुन्हा तीच बस परत फिरवुन आहुर्ली पर्यंत पाठवावी. कारण या पुर्वी नाशिक हुन येणारी बस ही बंद केली गेली आहे.हीच बस आहुर्लीहुन परत नाशिक पाठवावी. सकाळी कुशेगाव मुक्काम वरुन ती बस नाशिक जाते. तीच बस परत सकाळी आहुर्ली पर्यंत पाठवावी. म्हंणजे सकाळी शालेय विदयार्थी व कामगाराचीं सोय होईल. व पुन्हा नाशिक जाऊन ती बस आहुर्ली मार्गे घोटी पाठवावी. या पद्धतीने बस फेरी नियोजन केल्यास आहुर्ली सांजेगाव परिसरातील पंधरा वीस गावाातील प्रवाशाचीं मोठया प्रमाणात सोय होईल.

