
सिन्नर (प्रतिनिधी) शिक्षण विभाग पंचायत समिती सिन्नर व सिन्नर तालुका विज्ञान गणित अध्यापक संघ सिन्नर यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय विज्ञान मेळाव्याचे आयोजन सोमवार दिनांक 10 ऑगस्ट 2026 रोजी *महात्मा फुले हायस्कूल* संगमनेर नाका सिन्नर येथे करण्यात आले होते. सदर कार्यक्रमासाठी पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी माननीय श्री.राजेश डामसे,शिक्षण विस्तार अधिकारी श्री.कैलासजी सांगळे,महात्मा फुले विद्यालयाचे प्राचार्य श्री. मधुकर देशमुख सर,प्र.पर्यवेक्षिका सौ.सविता काठे परीक्षक म्हणून श्री. एकनाथजी खैरनार व श्री.राजेंद्रजी महात्मे मंचावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती.माधुरी वरंदळ यांनी केले तर प्रास्ताविक सिन्नर तालुका विज्ञान गणित अध्यापक संघाचे अध्यक्ष श्री.शिवाजी गाडेकर यांनी केले. यावेळी तालुक्यातून विविध विज्ञान प्रेमी शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्रीमती माधुरी वरंदळ यांनी विशेष परिश्रम घेतले. भारतीय ऊर्जा क्षेत्र 2047: भवितव्य (संधी)आणि आव्हाने या विषयावरआपल्या सगर विद्या प्रसारक शिक्षण संस्था संचलित महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय सिन्नर शाळेचे नेतृत्व करणाऱ्या कुमारी.गौरी कैलास लोणारे हिला यावेळी उत्तेजनार्थ पारितोषिक प्रदान करण्यात आले.

